मुगाच्या डाळीपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, चव लागेल भारी

Manasvi Choudhary

नाश्ता

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार मानला जातो. नाश्ता केल्याने संपूर्ण दिवस शरीराला ऊर्जा मिळते. पण अनेकदा अनेकांना सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळत नाही.

Breakfast Recipe

५ झटपट रेसिपी

अशावेळी तुम्ही सोप्या आणि चवदार रेसिपी ट्राय करून शकता. आज आम्ही तुम्हाला 5 रेसिपी सांगणार आहोत ज्या झटपट बनवता येतील

Breakfast Recipe | yandex

मुगाच्या डाळीच्या रेसिपी

मूगाची डाळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. या डाळीमध्ये प्रथिने, फायबर यासांरखी जीवनसत्वे असतात ज्यामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते.

5 Moong Dal Breakfast Recipe

मूळ डाळ चिला

मूग डाळ चिला हा एक टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे. मूगाची डाळ वाटून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला भाज्या, कांदा आणि मसाले घालून मिश्रण तव्यावर पसरवून घ्या. गरमा गरम मूग डाळ चिला तयार होईल.

Moong Dal Chilla

मूग डाळ डोसा

मूग डाळ डोसा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. मूगाच्या डाळीचे पीठ घ्या त्यात मीठ आणि मसाले मिक्स करा. गरमा गरम तव्यावर हे पीठ पसरवून पातळ डोसा बनवा.

Moong Dal Dosa

मूग इडली

मूगाच्या डाळीची इडली बनवण्यासाठी डाळ ३ ते ४ तास भिजत घाला नंतर ती वाटून घ्या त्यात मीठ मिक्स करून इडलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाका आणि वाफवून घ्या.

Moong Dal Idli

मोड आलेले मूग

मोड आलेले मूग त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची आणि मसाले मिक्स करून तुम्ही मूग भेळ खाऊ शकता.

Moong Dal Salad

मुगाच्या डाळीचा उपमा

मुगाच्या डाळीचा उपमा बनवण्यासाठी डाळ हलकी भाजून घ्या. कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता,हिरवी मिरची फोडणी द्या नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करून मुगाची डाळ घाला. थोडेसे पाणी मिक्स करा. गरमा गरमा मुगाच्या डाळीचा उपमा तयार होईल.

Moong Dal Upma

Next: उपमाच्या 5 वेगवेगळ्या रेसिपी, न खाणारेही चाटून पुसून खातील

Upma Recipe
येथे क्लिक करा...