उपमाच्या 5 वेगवेगळ्या रेसिपी, न खाणारेही चाटून पुसून खातील

Manasvi Choudhary

नाश्ता

रोज सकाळी उठल्यावर 'आज नाश्त्याला काय बनवायचे?' असे असा प्रश्न रोजच महिलांना पडतो. यासाठी आज आम्ही काही सोप्या रेसिपी सांगणार आहोत.

Breakfast

हेल्दी उपमा रेसिपी

 रोज तोच तोच पोहे, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी उपमाच्या रेसिपी नक्की ट्राय करा.

Healthy Upma Recipe

उपमा रेसिपी

उपमा हा केवळ चविष्टच नाही, तर पचायलाही हलका असतो. जर तुम्हाला नेहमीचा साधा उपमा खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही या खालील ५ रेसिपी ट्राय करा.

Upma Recipe

मिक्स भाज्यांचा उपमा

जर तुम्हाला नाश्ता पौष्टिक करायचा असेल, तर रव्यासोबत भरपूर भाज्या वापरा. उपमा बनवताना त्यात बारीक चिरलेला गाजर, मटार, फरसबी आणि सिमला मिरची टाका.

Mix Vegetable Upma

डाळींचा उपमा

डाळींचा उपमा दाक्षिणात्य पद्धतीचा प्रसिद्ध उपमा आहे. यामध्ये नेहमीच्या रव्याचा वापर न करता मूग डाळ किंवा उडीद डाळ हलकी भाजून, मिक्सरमध्ये जाडसर दळून त्याचा उपमा बनवला जातो.

Lentil Dal Upma

स्वीट कॉर्न उपमा

लहान मुलांसाठी तुम्ही उपमा तयार करताना किंवा फोडणीमध्ये उकडलेले स्वीट कॉर्न मिक्स करा. मक्याच्या गोडव्यामुळे आणि वरून थोडी कोथिंबीर-कढीपत्ता टाकल्यामुळे या उपम्याला वेगळी चव मिळते.

Sweet Corn Upma

रवा आणि तांदूळ मिक्स उपमा

नेहमीच्या गव्हाच्या रव्याऐवजी तांदळाचा रवा वापरून हा उपमा बनवला जातो. हा उपमा अत्यंत मऊ आणि सुटसुटीत होतो.

upma

नाचणी आणि रवा मिक्स उपमा

वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाचणी आणि रवा मिक्स उपमा बनवा. नाचणीचा रवा हा लोहाचा आणि कॅल्शियमयुक्त असत हा उपमा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Ragi Upma Recipe

next: कानामध्ये 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा बहिरेपणा येणारे; वेळीच ओळखा, नाहीतर...

येथे क्लिक करा...