कानामध्ये 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा बहिरेपणा येणारे; वेळीच ओळखा, नाहीतर...

Manasvi Choudhary

कान

मानवी शरीराच्या सर्वात महत्वाच्या संवेदनशील ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे कान. कानांमुळेच आपण आजूबाजूचा आवाज ऐकतो. हा आवाज लहरींच्या स्वरूपात कानाद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर मेंदू त्याला प्रतिसाद देतो.

Ear Care Tips

कानाच्या समस्या

मात्र, बदलती जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे आजकाल अनेकांची श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या निर्माण होत आहे. श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या वाढत्या वयात तर काही लोकांना तरूणपणातही उद्भवते. अनेकजण या समस्यांकडे सुरूवातीला दुर्लक्ष करतात.

Ear Problems

वैद्यकीय सल्ला महत्वाचा

वैद्यकीय माहितीनुसार, श्रवणशक्ती कमी होणे म्हणजे अचानक पूर्णपणे ऐकू येणे बंद होणे असे नाही. याची सुरुवात अतिशय संथ गतीने आणि काही विशिष्ट लक्षणांनी होते. ही लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Tinnitus Warning Signs

आवाज येतो पण शब्द स्पष्ट न समजणे

श्रवणशक्ती कमी होण्याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे समोरच्याचा आवाज तर येतो, पण तो नेमका काय बोलतोय ते शब्द स्पष्ट समजत नाहीत.

Muffled Speech

गर्दीच्या ठिकाणी ऐकण्यास त्रास होणे

एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा गर्दीच्या ठिकाणी आजूबाजूला इतर आवाज असताना समोरची व्यक्ती काय बोलतेय हे समजणे कठीण जाते.

Difficulty in Crowds

समोरच्याला वारंवार बोलायला सांगणे

जर तुम्हाला एखाद्याचे बोलणे नीट ऐकू न आल्यामुळे त्यांना "परत सांगा" किंवा "काय म्हणालात?" असे वारंवार विचारावे लागत असेल, तर हे तुमच्या कानांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे धोक्याचे चिन्ह असू शकते.

Asking to Repeat

टीव्ही किंवा फोनचा आवाज वाढवणे

घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत तुम्हाला टीव्ही, मोबाईल किंवा गाणी ऐकताना आवाज खूप जास्त वाढवून ठेवावा लागत असेल, तर तुमच्या श्रवणशक्तीची तपासणी करण्याची वेळ आली आहे.

High Volume Habits | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: काळे की पिवळे, आरोग्यासाठी कोणते खजूर सर्वात बेस्ट?

येथे क्लिक करा...