काळे की पिवळे, आरोग्यासाठी कोणते खजूर सर्वात बेस्ट?

Manasvi Choudhary

खजूर खाण्याचे फायदे

आयुर्वेदात खजूर हे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. शारीरिक थकवा, मानसिक अशक्तपणा दूर करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत खजूर खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Khajur Benefits

शरीरासाठी फायदेशीर

विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊब मिळते आणि सर्दी-खोकला या आजारांपासून संरक्षण होते.

Khajur Benefits

काळे खजूर - पिवळे खजूर

बाजारात काळे आणि पिवळे खजूर दोन प्रकारचे खजूर मिळतात . या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Black Dates Vs Yellow Dates

काळे खजूर

काळे खजूर हे नैसर्गिकरित्या झाडावर पूर्णपणे पिकल्यानंतर काळे होतात म्हणून त्यांना काळे खजूर ओळखले जाते. हे खजूर अतिशय मऊ आणि चवीला गोड असतात.

Black Dates Benefits

काळ्या खजूरचे फायदे

काळ्या खजूरमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी काळे खजूर खातात.

Black Dates Benefits

पिवळे खजूर आणि फायदे

पिवळे खजूर हे पूर्णपणे पिकण्यापूर्वीच म्हणजेच काढतात त्यामुळे हे खजूर थोडे कडक पिवळे दिसतात. पिवळे खजूर चवीला थोडे तुरट-गोड लागतात. पिवळे खजूर जर तुम्ही वाळवले तर ते वर्षभर टिकतात.

Yellow Dates Benefits

कधी खावे खजूर?

1) आयुर्वेदानुसार भिजवलेले खजूर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. खजूर कधीही भिजवून खा.

2) रात्री झोपण्यापूर्वी ३ ते ४ खजूर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे खजूर खा. भिजवल्यामुळे खजूर पचायला हलके होतात

Dates Benefits | yandex

3) १ ग्लास दुधामध्ये ३-४ खजूर टाकून दूध चांगले उकळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी हे कोमट दूध प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि वजनही नियंत्रणात राहते.

dates | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: सोन्यापेक्षाही महाग आहे 'हे' फळ, किंमत वाचून धक्काच बसेल

World Most Expensive Fruits
येथे क्लिक करा..