Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी आहारात फळांचे सेवन केले जाते. फळ हे आपल्या रोजच्या आहारातील मुख्य घटक आहे. जगात अनेक प्रकारची फळे आढळतात, ज्यांची किंमत सामान्यतः २०० ते ५०० रुपयांपर्यंत असते.
परंतु, जगात एक असेही फळ आहे, ज्याची किंमत हजारोंमध्ये नाही तर थेट लाखांमध्ये आहे. जगातील सर्वात महागडे फळ नेमके कोणते आहे आणि ते कुठे आढळते? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
जपानमधील युबारी, टरबूज हे जगातील सर्वाधिक महागड्या फळापैंकी एक आहे. जपानच्या होक्काइडो शहरात याची लागवड केली जाते.
विशेष म्हणजे हे फळ इतर सामान्य फळांसारखे शेतात पिकवले जात नाही. तर अत्यंत काळजीपूर्वक, नियंत्रित तापमान असलेल्या ग्रीनहाऊसमध्ये या फळाची शेती केली जाते.
हे फळ चवीला खूप गोड असते. आंब्यासारख्या दिसणाऱ्या या फळांची किंमत प्रति किलो २ ते ३ लाख रूपये असू शकते.
माहितीनुसार, २००८ मध्ये या युबारी टरबूजाच्या एका जोडीचा विक्री २० ते २४ लाख रुपयांना झाला होती. त्यामुळे हे जगातील सर्वात महागडे फळ मानले जाते.