Bhooth Bangla OTT SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhooth Bangla OTT : रिलीज होऊन एक दिवस होत नाही तोच ओटीटीवर येणार अक्षय कुमारचा चित्रपट? 'भूत बंगला'बाबत मोठी अपडेट

Akshay Kumar Bhooth Bangla OTT Release Update : अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'भूत बंगला' ला चित्रपट 17 एप्रिलला रिलीज झाला आहे.

'भूत बंगला' चित्रपटाने जगभरात २० कोटींपार कमाई केली आहे.

'भूत बंगला' हा अक्षय कुमारचा हॉरर- कॉमेडी चित्रपट आहे.

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या हॉरर- कॉमेडी चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी 'भूत बंगला' थिएटर गाजवत आहे. 'भूत बंगला' चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित आहे. 'भूत बंगला' ला चित्रपट 17 एप्रिलला रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होतात, त्याच्या ओटीटी रिलीजची चर्चा पाहायला मिळत आहे. 'भूत बंगला'चे ओटीटी रिलीज अपडेट जाणून घेऊयात.

'भूत बंगला' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'भूत बंगला' सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. त्यामुळे थिएटरमधील यशानंतर 'भूत बंगला' चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. हिंदी चित्रपटांचे ओटीटी स्ट्रीमिंग जवळपास थिएटर रिलीजनंतर ४५ ते ६० दिवसांनी होते, त्यामुळे 'भूत बंगला' जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला ऑनलाइन प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

'भूत बंगला' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'भूत बंगला' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे १२.२५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यामध्ये 'पेड प्रिव्ह्यू प्रदर्शनांतून मिळालेल्या ३.५० कोटी रुपयांच्या नेट कमाईची भर घातल्यास, चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई सुमारे १५.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाने जगभरातून एकूण २३.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये भारतातील एकूण (Gross) १८.९० कोटी रुपये आणि परदेशातील ५ कोटी रुपयांच्या कमाईचा समावेश आहे.

'भूत बंगला' चित्रपट अर्जुनच्या कथेभोवती फिरतो; ज्यामध्ये तो मंगळपूर येथील 'भयानक' वाड्यात आपल्या बहिणीचे लग्न पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. चित्रपटाच्या कथानकात १,००० वर्षे जुन्या शापाचा तपास, 'वधूसुर' नावाचा एक आसुरी भूत आणि वाड्याला होणाऱ्या अलौकिक घटनांचा समावेश आहे. 'भूत बंगला' चित्रपटात अक्षय कुमारसोबत असरानी, राजपाल यादव, जिशू सेनगुप्ता, तब्बू, परेश रावल आणि वामिका गब्बी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील लाडक्या लेकींना मिळतात १ लाख १ हजार रुपये; तुम्हाला मिळाले का?

Maharashtra News Live Update: अशोक खरातला महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Horror Comedy Movies: 'भूत बंगला' विसरा... हे आहे भारतातील सर्वात बेस्ट 'हॉरर-कॉमेडी' चित्रपट

Amravati Case: "मुलींशी हाय हॅलो नको" तर...; अयानला लव्हगुरुच्या टिप्स; आरोपीनं मुलींना कसं अडकवलं जाळ्यात?

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपासून 'या' ५ राशींचे नशीब पलटणार! माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येईल 'पैसाच पैसा'

SCROLL FOR NEXT