Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, विधान परिषदेच्या निवडणुका, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण,अमरावती आणि नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण आदी राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam
Published On

Jalgaon: भुसावळ तालुक्यातील दीपनगर महामार्गावर अपघात, दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव -

भुसावळ तालुक्यातील दीपनगर प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर आज दुचाकी अपघात झाला.

या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

अहिल्यानगर -

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

पारनेर तुक्यातील ढवळपुरीत येथे उन्हाच्या तडाख्यात महिलेचा मृत्यू

शेतात काम करताना विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू

दुपारच्या कडक उन्हात मका कापताना चक्कर येऊन कोसळल्याने उपचाराआधीच मृत्यू

हर्षदा रावसाहेब चौधरी असे 46 वर्षीय मृत महिलेचे नाव

Pune:  शिरूर पोलिस ठाण्याच्या समोर दोन गटात तुफान राडा 

शिरूर पोलीस ठाण्याच्या समोर संध्याकाळी सुमारास पुन्हा एकदा दोन गट आमनेसामने येत वादावादी झाल्याची घटना घडली.

शिरुर पोलीस स्टेशनच्या समोर काही काळ तणाव निर्माण झाला होता.विशेष म्हणजे, चार-पाच दिवसांपूर्वी शिरुर पोलीस स्टेशनला दोन गटांमध्ये झालेल्या वादात काही जण जखमी झाले होते.

त्या घटनेची पार्श्वभूमी ताजी असतानाच पुन्हा वाद उफाळल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Buldhana: जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एसी यंत्रणा सुरू, साम टीव्हीच्या बातमीचा दणका

बुलडाणा -

साम टीव्हीच्या बातमीचा दणका

बातमी प्रसारित होतच एका तासात एसी यंत्रणा सुरु

तातडीने अतिदक्षता विभागातील पाच दिवसापासून बंद असलेली एसी यंत्रणा दुरस्त करून केले सुरु

साम टीव्हीच्या बातमीच्या इम्पॅक्टचा रुग्णांना फायदा झाला

जळगावात महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने काँग्रेस विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निदर्शने...

नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

- तर उर्वरित तिघांची २० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

- आरोपी क्रमांक १ पासून आरोपी क्रमांक पाच पर्यंत सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी

- रौनक खंडेलवाल, आकाश सामल, सन्नी जैन, बालकृष्णन कुरूप आणि प्रतिक पांडे यांना न्यायालयीन कोठडी

- तर आनंद पटेल, विनीत गेरेलानी आणि आयुष साहित्य यांची पोलीस कोठडीत रवानगी

जळगावात महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने काँग्रेस विरोधात शिंदे गटाच्या वतीने निदर्शने

जळगावात महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने काँग्रेस विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निदर्शने...

चिमुकल्यांना मुलांना सोबत घेत शिवसेना शिंदे गटाच्या महिला या आंदोलनात सहभागी झाल्याच पहायला मिळालं..

झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन.

जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन विरोध केल्याने महिलांच्या आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सिंदफना नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या अंगणवाडीचे ग्रामस्थांच्या पुढाकारातून नूतनीकरण

बीडच्या शिरूर तालुक्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने सिंदफणा नदीला महापूर आला होता. याच महापुरात शिरूर, कोळवाडी, ढोकवड आणि टेंभुर्णी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठे नुकसान झाले होते.

आता याच शाळेचं नूतनीकरण गावातील ग्रामस्थ जयेश कासट यांच्या निरंजन सेवाभावी संस्था आणि लोकनीधीतून करण्यात आले.

नव्याने उभारल्या गेलेल्या अंगणवाडी आणि वर्गखोल्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पार पडले.

या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेची नव्याने उभारणी झाल्याने लेझीम पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

वाशिम शहरात थार गाडीचा थरार 

वाशिम शहरातील देवपेठ भागात भरधाव अनियंत्रित थार गाडीचा थरार पाहवयास मिळाला.

थार चालकाचा ताबा सुटल्याने या गाडीने रस्त्यावरील तीन दुचाकींना जोरदार धडक दिली

गाडी इतकी अनियंत्रित होती की बाजूला असलेल्या विहिरीच्या कठड्यावर चढून महावितरणच्या खांबाला धडक देत पुढे एका घराच्या भिंतीला भिडली.

यात दुचाकी वरील दोन जण जखमी झाले असून,तीन दुचाकी एक विद्युत पोल आणि घराच्या भिंतीच मोठ नुकसान झाल आहे.

या अपघातामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

उरण येथील लॉजिस्टिक्स कपंनीत मोठा स्फोट

उरण येथील jwr लॉजिस्टिक्स कपंनीत मोठा स्फोट तसेच भीषण आग लागलीय केमिकल गोडाऊन पेटल, भीषण स्फोट देखील झालाय .आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू सर्वत्र परिसरात धुराचं साम्राज्य अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी

अधिसेविकेकडून महिला कर्मचाऱ्याला कथित मारहाण; धुळे जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे आंदोलन

धुळ्यातील साक्री रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आज परिचारिका आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले, काल हिरे शासकीय रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिसेविकेने वॉर्डमध्ये नियम मोडून प्रवेश करत अरेरावी केली, आणि या प्रकाराचे मोबाईलवर चित्रण करणाऱ्या एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल हिसकावून, तिला कथित मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर आरोपामुळे कर्मचारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे,

Sangali : सांगलीच्या वाळवा तालुक्यात अवकाळी पाऊस

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून उन्हाचा चांगला तडका वाढला होता.

तालुक्यात आज चार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली..

त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना

- त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना

- अशोक खरात, म्हाडा घोटाळा, टीसीएसनंतर आता त्र्यंबकेश्वर दर्शन प्रकरणी SIT ची स्थापना

- दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी SIT करणार सखोल तपास

- त्र्यंबकेश्वर येथील दर्शन काळाबाजार प्रकरणी शासनाकडून गंभीर दखल

- विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोन्ही पुतणे आणि एक सहकारी आहे अटकेत

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आक्रमक

  • रत्नागिरी-कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आक्रमक

  • सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी

  • प्रति आंब्याच्या झाडाला पाच हजार रुपये मदत आणि काजूला एकरी तीन लाख रुपये मदत मिळावी यासाठी शेतकरी करणार मुंबईकडे कुच

  • 15 मे रोजी आंबा आणि काजू शेतकऱ्यांचा वर्षावर र्मोर्चा

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा

  • रत्नागिरी पार पडला शेतकरी एल्गार मेळावा, यावेळी केली घोषणा

खेड तालुक्यात रस्त्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यांचा मोठा प्रश्न भेडसावत होता. पावसाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र होत होती. मात्र आता महसूल विभागाने पुढाकार घेत पानंद रस्ते खुले करण्याची आणि त्यांचे मजबुतीकरण करण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे.

चाकण-तळेगाव मार्गावर कंपनी बसला भीषण आग 

चाकण परिसरातील सिग्मा कंपनीची बस उभी असताना अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात रस्त्यावर कारने घेतला पेट

डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात धक्कादायक प्रकार घडला. रस्त्यावर कारने पेट घेतला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३९ अंशांवर

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढताना दिसतोय. एप्रिलच्या मध्यातच उन्हाने कडक रूप धारण केलं असून नागरिक हैराण झालेत. आज कोल्हापुरात तापमान तब्बल ३९ अंशांपर्यंत पोहोचलं आहे. भर दुपारी बाहेर पडणंही कठीण झालंय.

परतवाडा येथील लैगिंक शोषनातील प्रकरणात पोलिसांना मोठं यश

परतवाडा येथील लैगिंक शोषनातील प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी एसआयटीच्या पथका समोर. एस आय टी च्या पथकातील महिला पोलीस इन्स्पेक्टर कु.मुनेश्वर पीडिता कडून चौकशी करत आहेत.

नवी मुंबईतील जे डब्लू पाडेघर येथील गोडाऊनला भीषण आग

नवी मुंबई परिसरातील जे डब्ल्यू पाडेघर येथील कस्टम गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे या आगीमुळे कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे अग्निशमन दलाच्या अद्याप घटना स्थळी दाखल झाली नाही.

वाशिम जिल्ह्यात यंदा डीएपी खताच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ 

वाशिम जिल्ह्यात यंदा डीएपी खताच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झालीये, अवघ्या ९ दिवसांतच विक्रीने विक्रमी उंची गाठली आहे. १ ते ९ एप्रिलदरम्यान तब्बल ५५५ मेट्रिक टन खताचे वितरण झाले आहे, मागील वर्षी याच कालावधीत केवळ १३ मेट्रिक टन विक्री झाली होती. म्हणजेच यंदा खत विक्रीत सुमारे ४०३० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.

परभणीच्या सेलूमध्ये चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; घटनेनंतर जाळपोळ व तोडफोड

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गायत्रीनगर परिसरात काल उशिरा रात्री गंभीर घटना घडली. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही अज्ञात व्यक्तींनी डीजे लावलेले चारचाकी वाहन आणि एक दुचाकी जाळून टाकत तोडफोड केली.

सटाणा बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात नगरसेवकांचा रास्ता रोको आंदोलन

नाशिकच्या सटाणा शहरातून जाणा-या सुरत-शिर्डी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने सटाणा शहरातील नागरकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या कामाकडे पण दुर्लक्ष होत असल्याने आज बांधकाम विभाग व नगरसेवकांची बैठक झाली मात्र नेहमीचे उत्तर मिळाल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे समाधान न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत नगराध्या हर्षदा पाटील यांच्या सह उपनगराध्यक्ष,नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत सटाणा-मालेगाव-देवळा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने करण्यात आला मोर्चा

आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज तीर्थापासून ते जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला असून आमोदा गावात असलेले आराध्य दैवत महर्षी वाल्मिक यांच्या मूर्तीच्या विटंबना घटनेबाबत समाजकंटकाला पोलिसांनी कठोरातील कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी समाजातील सर्व समाज बांधव एकवटले होते.

पंढरपुरात अवघ्या 12 तासात चोरीचा छडा; आरोपींकडून 18 लाख रूपयांचा ऐवज जप्त 

पंढरपूर तालुका पोलीसांनी अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघड करून चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये चार महिला आणि एक पुरुष अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोने,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 18 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पंढरपुरात अवघ्या 12 तासात चोरीचा छडा; आरोपींकडून 18 लाख रूपयांचा ऐवज जप्त

पंढरपूर तालुका पोलीसांनी अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघड करून चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये चार महिला आणि एक पुरुष अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोने,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 18 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कृषी केंद्र चालक हिंगोलीत दुहेरी संकटात

हिंगोली जिल्ह्यात सध्या कृषी केंद्र चालक दुहेरी संकटात सापडले आहेत खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून कृषी केंद्र चालकांना खताची शेतकऱ्यांना विक्री करताना लिंकिंग द्वारे करण्याची अट घालण्यात आली आहे तर प्रशासनाने मात्र लिंकिंग द्वारे खताची विक्री केल्यास थेट कृषी केंद्र चालकांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे

धुळ्यात गॅस सिलेंडर टंचाईवरून नागरिकांचा रास्ता रोको; अक्षय तृतीयेआधी संताप उसळला

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर बसून वाहनांची अडवणूक करत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. अक्षय तृतीय पूर्वीही सिलेंडर उपलब्ध नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पुरणपोळी व गोडधोड बनवण्याची परंपरा असताना लांबच लांब रांगा लागल्याने सण साजरा कसा करायचा, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

अमरावती न्यायालयासमोर एका वकिलाला महिलांकडून मारहाण

अमरावती न्यायालयासमोर एका वकिलाला महिलांकडून मारहाण...

कौटुंबिक वादातून वकीलाला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मारहारणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

अजूनही पोलिसांत तक्रार दाखल नाही..

पंढरपुरात चंद्रभागा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसोबत पोहताना दुर्घटना

पंढरपुर येथे चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या अमित प्रक्षाळे (३५, रा. नारायण चिंचोली, सध्या पुणे) यांचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत इसबावी येथील जॅकवेलजवळ पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. कालपासून सुरू असलेला शोध आज दुपारी संपला असून त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त गावी आलेल्या अमित यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूर विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेत बदल; पश्चिम दरवाजा १५ दिवस बंद

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे जतन व संवर्धनाच्या कामामुळे दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पदस्पर्श दर्शनानंतर भाविक ज्या पश्चिम दरवाजातून बाहेर पडतात, तो पुढील १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दक्षिण दरवाजातून बाहेर पडण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

कल्याणमध्ये संशयास्पद व्यक्तीचा वावर; सोसायटीत भीतीचे वातावरण

कल्याण

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सनराईज गॅलेक्सी सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार

अनोळखी व्यक्तीचा संशयास्पद वावर.

व्हिडिओ झाला व्हायरल.

बेल दाबण्याच्या बहाण्याने इमारतीची रेकी केल्याचा स्थानिकांना संशय

इमारतीच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला हा अनोळखी व्यक्ती.

सोसायटीतील रहिवाशांमध्ये काहीसे भितीचे वातावरण.

भोंदू अशोक खरातला महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिक ब्रेक

- भोंदू अशोक खरातला महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- पाचव्या गुन्ह्यात SIT कडून अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाकडे अर्ज

- पाचव्या गुन्ह्यात SIT उद्या पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करणार

- उद्या अशोक खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार

SIT अधिकारी आणि सरकारी वकील कोर्टात पोहचले

थोड्याच वेळात होणार सुनावणीला सुरुवात

भोंदू अशोक खरात व्हिसीद्वारे कोर्टात हजर राहणार

नेस्को कन्सर्ट ड्रग्स प्रकरणी फरार आरोपीला रायगडच्या पोलादपूरमधून अटक

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ड्रग्ज प्रकरणी फरार आरोपीला रायगडच्या पोलादपुरमधून अटक करण्यात आली आहे. या म्युझिक कन्सर्टदरम्यान ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दोन युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार निदा खानचे मेडिकल सर्टिफिकेट आले समोर

फरार निदा खानचे मेडिकल सर्टिफिकेट आले समोर

नाशिक धर्मांतर प्रकरण नवा ट्विस्ट

मुख्य संशयित निदा खान 20 दिवसांपासून फरार

मेडिकल सर्टिफिकेटमुळे संशय, तपासाला नवं वळण

13 एप्रिलला मुंबईतील डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेतल्याची माहिती

फरार असताना मुंबईत उपस्थिती? पोलिस तपासात मोठा प्रश्नचिन्ह

डॉक्टरने प्रत्यक्ष तपासणी न करता सर्टिफिकेट दिल्याचा संशय

सर्टिफिकेटमध्ये गर्भवती असल्याचा उल्लेख..

Chiplun: चिपळूण तालुक्यातील शिरवली-गौळवाडी येथे बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

चिपळूण तालुक्यातील शिरवली-गौळवाडी येथे बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

बिबट्याचा अगदी मानवी वस्ती नजीकच मृत्यू

भक्षाच्या शोधात बिबटा मानवी वस्तीच्या दिशेने

मृत बिबट्या नर जातीचा

मृत बिबट्याची माहीती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल

बिबट्याचा पंचनामा करुन वनविभागाने शवविच्छेदनासाठी पाठवले

Washim: वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...

राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे, मागील आठ दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातही पाऱ्याचा आलेख वाढत गेला आहे, वाशिम जिल्ह्यात या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय...तर प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून 11 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Kokan: कोकण किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

कोकण किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

तापमान वाढीसोबतच हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा देखील इशारा

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

तापमानाचा पारा 41 अंशांवर

कधीही अवकाळी पाऊस बरसेल अशी परिस्थिती

अरबी समुद्रावर काय ढगांची दाटीवाटी

पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी वर अशीच परिस्थिती राहण्याचा इशारा

ढगाळ वातावरणाचा परिणाम आंब्यावरती होण्याची शक्यता

Pune: पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चारचाकी वाहनाला आग लागली

पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चालू वाहनाला आग लागली

आगीत चार चाकी मालवाहतूक टेम्पो जळून खाक

आगीचे कारण अस्पष्ट

KDMC: कल्याण-डोंबिवलीत सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

सरकारकडून अचानक स्टेनोग्राफर पदांसाठीची भरती रद्द

स्टेनोग्राफर पद ही मृत घोषित करू नये. गेली पाच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. अचानक असे केल्यास खूप विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. स्टेनोग्राफर मृत घोषित न करता पद भरती करण्यात यावी ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाच्या भरती रद्दच्या शासनाच्या निर्णयाचा पुण्यात विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला. शासनाने निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Local: ठाणे ते कर्जत लोकलच्या महामार्गावर साडेतीन महिन्यात गर्दीचे रेल्वेतून पडून 72 बळी..

ठाणे ते कर्जत लोकलच्या महामार्गावर साडेतीन महिन्यात गर्दीचे रेल्वेतून पडून 72 बळी..

विविध कारणांनी 215 जणांचा मृत्यू 173 जखमी

जानेवारी ते 14 एप्रिल या अवघ्या साडेतीन महिन्यात विविध कारणांनी अपघात झाले आहे..

पंधरा डब्यांची आणि बंद दरवाजांची लोकल तातडीने कधी सुरू होणार..

Pune: पुण्यात हवाईदलाच्या विमानाला अपघात झाल्यानं वाहतूक विस्कळीत

पुण्यात हवाईदलाच्या विमानाला अपघात झाल्यानं वाहतूक विस्कळीत

इंडिगोची येणारी ३१ आणि जाणारी ३४ अशी ६५ विमाने रद्द

एअर इंडियाची येणारी ३ आणि जाणारी ३ विमाने रद्दे

स्पाईस जेटचीही येणारी २ दोन आणि जाणारी ३ विमाने रद्द

एयर इंडिया एक्सप्रेसचीही १० विमाने रद्द

TCS प्रकरणात अट्रोसिटी कायद्याची भर,

TCS प्रकरणात अट्रोसिटी कायद्याची भर, बलात्काराच्या गुन्ह्यात अट्रोसिटीचा ऍक्ट समाविष्ट केला

तक्रारदार महिला मागास प्रवर्गातील असल्याची माहिती, 25 मार्चच्या फिर्यादीनंतर कारवाईला वेग

9 फिर्यादी पैकी अनेकांत लैंगिक अत्याचाराचे आरोप

धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर कलम लागू आहेत

आता अट्रोसिटी ॲक्टमुळे प्रकरण अधिक संवेदनशील

अट्रोसिटी कायद्यामुळे आरोपींवर कायदेशीर दबाव वाढला

TCS कडून नाशिक प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट

TCS कडून नाशिक प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट

प्रकरणाची डेलॉइट, ट्रीलिगलमार्फत स्वतंत्र चौकशी सुरू

केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, निदा खान HR नसल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण

नाशिक युनिट बंद असल्याच्या बातम्या फेटाळल्या, POSH चॅनेलवर तक्रारी नसल्याचा दावा कंपनीचा

कर्मचारी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले, शून्य सहनशीलतेच्या धोरणावर टीसीएस ठाम राहणार

Nashik: महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज मोठी बैठक

महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज मोठी बैठक

आयटी कंपन्या, प्रशासन, लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक

खरात, एरंडे, TCS प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

IT कंपन्यांसह सर्वच ठिकाणी विशाखा समिती तसंच पॉश कायद्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार

ई-बॉक्स पोर्टलद्वारे तक्रार प्रक्रिया सुलभ करणार, महिलांच्या सुरक्षेसाठी ॲक्शन प्लॅन ठरवला जाणार

महिला सुरक्षेसाठी झिरो टॉलरन्स धोरण देखील लागू करणार

Jalgaon: जळगाव महापालिका निवडणुकीनंतरची पहिलीच बैठक ठरली सोपस्कार

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार महिन्यानंतर झालेल्या बैठकीकडे प्रमुख नेत्यांची पाठ सत्कार उरकल्यावर घेतला काढता पाय

महापालिका निवडणुकीनंतर तब्बल चार महिन्यांनी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाची बैठक केवळ सोपस्कार ठरली. प्रदेशाकडून आलेले नेते केवळ तासभर मार्गदर्शन करून आणि विजयी नगरसेवकांचा सत्कार उरकून तातडीने रवाना झाल्याने कार्यकर्त्यांत 'नेते आले आणि गेलें' अशी भावना निर्माण झाली आहे.

Ashok kharat Case: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं जाणार

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातील खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाणार

पाचव्या दाखल गुन्ह्यात ताब्यासाठी SIT कडून अर्ज दाखल केला जाणार

SIT कडून पुढील चौकशीसाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार

कोर्टाच्या निर्णयावर पुढील कारवाईचे चित्र होणार स्पष्ट

नाशिकच्या TCS कंपनी प्रकरण; आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड

नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड

नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात SIT तपासाला वेग

आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग

चॅटिंगमधून संशयास्पद संवाद आले समोर

पीडितांना फसवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केल्याचा संशय

डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचे सत्य उघडणार

खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात आर्या हॉटेलमध्ये LPG सिलेंडरचा स्फोट

खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात आर्या हॉटेलमध्ये दोन एलपीजी सिलेंडर चा स्पोट.

स्फोटानंतर हॉटेलला भीषण आग, हॉटेलच्या आत मध्ये दोन जण अडकल्याची भीती.

खामगाव अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहोचलं, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.

हॉटेल रहिवासी परिसरात असल्याने शेजारील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवीण्याची प्रक्रिया सुरु.

Tuljabhavani: कर्नाटकातील भाविकांकडून तुळजाभवानीला तीन लाखाची देणगी

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याच्या हुमनाबाद तालुक्यातील मल्लिकार्जुन कलगी या भक्ताने श्री तुळजाभवानीच्या चरणी तीन लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे.मल्लिकार्जुन कलगी हे तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्यानंतर तुळजाभवानीच्या चरणी तीन लाख रुपयाची देणगी अर्पण केली. तुळजाभवानी मंदिर संस्थान कडे ही देणगी सुपूर्त केली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने देवीची प्रतिमा देऊन या भाविकाचा सन्मान करण्यात आला.

भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी १९ एप्रिलला..

पीकस्थिती, पावसाचे प्रमाण तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तविणारी भेंडवळ ची पारंपरिक घटमांडणी यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे .. त्यानंतर 20 एप्रिल ला सकाळी सूर्योदय अगोदर भाकीत केले जाणार आहे, या मांडणीद्वारे पावसाचे भाकीत काय येणार, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.. विदर्भासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या घटमांडणीतून अतिवृष्टी, दुष्काळ, पीकस्थिती, आर्थिक तसेच राजकीय परिस्थिती आणि विविध संकटांबाबत अंदाज वर्तविले जातात.. त्यामुळे या मांडणीबाबत शेतकरी वर्गासह राजकीय नेते, आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी उत्सुकता असते..

Vidarbha: विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम

विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम, अमरावतीत सर्वाधिक 44.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

आज नागपुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी.... वाढतं तापमान पाहता उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा इशारा...

विदर्भातील सहा जिल्हाचे तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक

अकोल्याच्या तापमानात किंचित घट, मात्र, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशीम आणि गडचिरोलीच्या तापमानात वाढ

Yavatmal: यवतमाळ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे उमेदवारांची पाठ

यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 47 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.दरम्यान नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार सरपंच पदासाठी नऊ तर 86 सदस्यांकरिता 50 अर्ज प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे 67 जागे करिता एकही नामनिर्देशन पात्र दाखल झाले नाहीये यावरून पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.यामुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

PMC: पुणे महापालिकेच्या 13 प्रभाग समित्या बिनविरोध....

महापालिकेच्या पंधरा प्रभात समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले पंधरापैकी तेरा समित्यांची निवडणूक अपेक्षाप्रमाणे बिनविरोध होणार असून दोन प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे 13 पैकी बारा समित्यांचे अध्यक्ष पद भाजपाला मिळणार असून एका समितीवर काँग्रेसचे अध्यक्ष असणार आहे.

Pune: पुणे शहरातील 216 उद्याने जास्त वेळ राहणार खुली...

महापालिकेच्या उद्यान विभागाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार 15 जून 2026 पर्यंत उद्याने सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत खुली राहतील तसेच मत्स्यालयाची वेळ सकाळी आठ ते 11 आणि संध्याकाळी चार ते नऊ अशी निश्चित केली आहे.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन

यवतमाळ जिल्हा कृषी विभागाने 2026-27 च्या खरीप हंगामासाठी कंबर कसली असून जिल्ह्यात नऊ लाख 14 हजार 807 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात गतवर्षीचा एक लाख 7 हजार मॅट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहेत तर यंदा दोन लाख 53 हजार मॅट्रिक टन रासायनिक खताची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे खताची टंचाई भेडसावण्याची शक्यता कमी आहे.

Pune: ओव्हरहेड केबल विरोधी कारवाईला ब्रेक....

अनधिकृत ओव्हरहेड केबल बाबत कुठलेही धोरण निश्चित नसताना महापालिकेने त्याविरुद्ध अचानक कारवाई सुरू केली अचानक याबाबत केंद्र सरकारची नियमावली असल्याची माहिती पुढे आली आता त्याचा आधार घेत महापालिका त्याबाबतची नियमावली करणार आहे त्यामुळे केबल विरोधी कारवाई स्थगिती झाली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळार विमान अपघात; धावपट्टीचे काम स्थगित

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो.

परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे.

पुणे विमानतळावर रनवे अपघात प्रकरण, रनवे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण

रनवे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण

सकाळी ७ः३० पासून विमाने उडण्यास सुरुवात होणार

तर ८ वाजल्यापासून विमाने उतरण्यास सुरुवात होणार

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेवरून वेगाने काम पूर्ण

रनवेचे काम युद्धपात़ळीवर पूर्ण करण्यात यश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com