Bhooth Bangla Trailer Review: नव्या चित्रपटाचा जुना ट्रेलर; अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये 'भागमभाग', 'भूल भुलैया'ची खिचडी

Bhooth Bangla Trailer Review: अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता नेटकरी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू शेअर केला आहे.
Bhooth Bangla
Bhooth Bangla canva
Published On

Bhooth Bangla Trailer Review: 'भूत बंगला'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या 'हॉरर-कॉमेडी' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, तब्बू, विद्या बालन, परेश रावल, असरानी आणि राजपाल यादव यांसारख्या अनुभवी कलाकारांचा समावेश असलेली एक जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळते. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंचतर दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार एकत्र काम करत आहेत. चला, भूत बंगलाच्या ट्रेलर चाहत्यांना कसा वाटला.

ट्रेलरमध्ये काय आहे?

‘भूत बंगला’च्या ट्रेलरमध्ये, अक्षय एका भयानक जंगलाच्या अगदी लगतच असलेल्या बंगल्याचा वारसदार बनतो. या जंगलचे नाव 'पिशाच वन' असते. परेश रावल अक्षयला बंगल्यात दडलेल्या धोक्यांबद्दल सावध करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अक्षय त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि तिथेच आपले लग्न करण्याचा निर्णय घेतो. असराणी अक्षयला सांगतो की, मंगलपूरमध्ये कोणीही लग्न करत नाही. कारण त्या जागेवर 'वधूसुर' नावाच्या एका दुष्ट शक्तीचा वावर आहे. ट्रेलरच्या शेवटी, अक्षय अजाणतेपणी वधूसुरला त्याच्या झोपेतून जागे करतो.

Bhooth Bangla
Marathi artist Death: लोककलेचा ओजस्वी आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

‘भूत बंगला’च्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा गाजलेला संवाद "बहन डर गई, बहन डर गई" आणि राजपाल यादवचा संवाद, "क्या मैं मंदिर की घंटी हूँ?" तसेच हेरा फेरी, हंगामा, भागमभाग, भूल भुलैया या चित्रपटातले सीन आणि डायलॉग दिसतात त्यामुळे ट्रेलर पाहून चाहते निराश झाले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, नविन काय आहे यामध्ये हे सगळं तर आधी बघितल्यासारखंच आहे. आणखी एकाने लिहीले, फिल्म नवीन ट्रेलर जुना तर आणखी एकाने लिहीले, 'भूत बंगला'मध्ये 'भागमभाग', 'भूल भुलैया'ची खिचडी आहे.

Bhooth Bangla
Sonali Kulkarni: अप्सरेने केलं नवं फोटोशूट, पाहा सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज

हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

अक्षयचा चित्रपट ‘भूत बंगला’ १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. तथापि, 'धुरंधर २' च्या प्रचंड प्रभावामुळे, निर्मात्यांनी त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट आता १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. दरम्यान, १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता या चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यूज' (सशुल्क पूर्व-दर्शने) सुरू होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com