Bhooth Bangla Collection : अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, 'धुरंधर २'ला टाकले मागे?

Akshay Kumar - Bhooth Bangla Box Office Collection Day 1 : अक्षय कुमारच्या 'भूत बंगला ' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत रणवीर सिंहच्या 'धुरंधर २'ला मागे टाकले आहे.
Akshay Kumar - Bhooth Bangla Box Office Day 1
Bhooth Bangla Collection saam tv
Published On
Summary

'भूत बंगला' चित्रपट 17 एप्रिलला रिलीज झाला.

'भूत बंगला' चित्रपट 'धुरंधर २'ला तगडी टक्कर देत आहे.

'भूत बंगला' चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे.

रणवीर सिंहच्या 'धुरंधर २'नंतर आता बॉक्स ऑफसवर अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' (Bhooth Bangla) चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. 'भूत बंगला' चित्रपटाने जगभरात २० कोटींपार कमाई केली आहे. सलग चार आठवडे अव्वल स्थानी असलेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'भूत बंगला' चित्रपटाने पहिल्याच दिवशी मागे टाकले आहे. 'भूत बंगला' चित्रपट 17 एप्रिलला रिलीज झाला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन पाहूया.

'भूत बंगला' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १

प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूत बंगला' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपट पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल पाहायला मिळत आहेत. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'भूत बंगला' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे १२.२५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यामध्ये 'पेड प्रिव्ह्यू प्रदर्शनांतून मिळालेल्या ३.५० कोटी रुपयांच्या नेट कमाईची भर घातल्यास, चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई सुमारे १५.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'भूत बंगला' चित्रपटाने जगभरात किती कमावले?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाने जगभरातून एकूण २३.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये भारतातील एकूण (Gross) १८.९० कोटी रुपये आणि परदेशातील ५ कोटी रुपयांच्या कमाईचा समावेश आहे. आता वीकेंडला 'भूत बंगला' किती कोटींची कमाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'भूत बंगला'ने 'धुरंधर २'ला मागे टाकले

'भूत बंगला' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर येताच रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' ला मागे टाकले आहे. 'धुरंधर २' ने सलग चार आठवडे बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थान मिळवले होते. मात्र प्रदर्शनाच्या ३० व्या दिवशी रणवीर सिंगच्या 'धुरंधर २ ' चित्रपटाच्या कमाईत मोठी घट दिसून आली. या दिवशी चित्रपटाने अंदाजे २.७० कोटी रुपयांची नेट आणि ३.२४ कोटी रुपयांची एकूण (Gross) कमाई केली. कमाईचा वेग मंदावला असला तरीही, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची एकूण cumulative नेट कमाई १,१०५.८२ कोटी रुपयांच्या प्रचंड आकड्यावर पोहोचली आहे.

Akshay Kumar - Bhooth Bangla Box Office Day 1
Bigg Boss Marathi 6 : गुलीगत किंग सूरज चव्हाणची झापुक झुपूक एन्ट्री; "बाईऽऽऽ..." म्हणत निक्की तांबोळीही आली, बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com