Bhooth Bangla Review: अक्षय कुमारचा 'भूत बंगला' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Bhooth Bangla Review: 'भूत बंगला' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहून आपल्या प्रतिक्रिया (Reviews) शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट लोकांना कसा वाटला, जाणून घेऊयात.
Bhooth Bangla
Bhooth Bangla canva
Published On

Bhooth Bangla Review: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूत बंगला' आज, १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. प्रदर्शनानंतर, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रेक्षकांनी हा 'हॉरर-कॉमेडी' चित्रपट चित्रपटगृहात पाहिला आहे, त्यांनी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली मते (रिव्ह्यू) मांडण्यास सुरुवात केली आहे. चला जाणून घेऊया, लोकांना या चित्रपटाबद्दल काय वाटते.

अक्षय कुमारचा 'भूत बंगला' लोकांना कसा वाटला?

'धुरंधर २' या स्पाय थ्रिलर चित्रपटाने संपूर्ण महिनाभर बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले होते. आता, विशेषतः कौटुंबिक प्रेक्षकांना टार्गेट करण्याच्या उद्देशाने अक्षय कुमारचा 'भूत बंगला' प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ज्या प्रेक्षकांनी 'भूत बंगला' चित्रपटगृहात पाहिला, त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले: "'भूत बंगला'चा रिव्ह्यू. रेटिंग – ४ स्टार्स. 'कॉमेडीचा बादशाह' अक्षय कुमार पुन्हा एकदा परतला आहे! प्रियदर्शन यांची खास शैली या चित्रपटात आहे.

Bhooth Bangla
Bigg Boss Marathi 6: जुने स्पर्धक येणार नवं टास्क घेऊन; बिग बॉस मराठी 6 मध्ये मेघा धाडे-पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची एंट्री

दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहीले, "भूत बंगला'मध्ये पहिला ४०% भाग कॉमेडी आहे; पुढील १०% भाग सस्पेन्स वळण घेतो; ५०% ते ९५% पर्यंतचा भाग पूर्णपणे गंभीर वाटतो; आणि शेवटचा ५% भाग पुन्हा कॉमेडी आहे. होतो. एकूणच, हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. पण वामिका गब्बीचं काम तेवढं तोडीस तोड नाही.

Bhooth Bangla
Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव फिनालेपूर्वीच लीक; 'हा' स्पर्धक जिंकणार ट्रॉफी!

आणखी एका नेटकऱ्याने कलिहिले: 'भूत बंगला' हा एक संपूर्णपणे 'पैसा-वसूल' चित्रपट आहे. अक्षय कुमारने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, 'सिच्युएशनल कॉमेडी' त्याच्यापेक्षा अधिक उत्तम कोणीही करू शकत नाही.

'भूल भुलैया' या चित्रपटाबद्दल

प्रियदर्शन आणि अक्षय कुमार हे दोघे जवळपास १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात तब्बू, परेश रावल, वामिका गब्बी, जिष्णू सेनगुप्ता, मिथिला पालकर, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि असरानी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) एका अहवालानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १२ कोटींहून अधिक कमाई करण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com