बिग बॉसच्या घरात गुलीगत किंग सूरज चव्हाणची धमाकेदार एन्ट्री झाली.
घरात सूरजसोबत निक्की तांबोळीही आली.
घरात येताच सूरजने आपल्या झापुक झुपूक स्टाइलने सर्वांना वेड लावले.
'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी थाटामाटात मार पडणार आहे. या सीझनमध्ये 'नशीबाचे दार' ही थीम होती. घरातील सर्व दार उघडून ५ स्पर्धक अंतिम फेरीत पोहचले आहे. त्यांना महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळत आहे. सुरूवातीपासून विजेता म्हणून तन्वी कोमलतेच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. तर राकेश आणि विशालचे चाहत्यांनी दोघांना आधीच विजेता घोषित केले आहे. 'बिग बॉस मराठी ६' विजेता कोण होणार, हे तर रितेश भाऊ ग्रँड फिनालेला सांगतील मात्र आता बिग बॉसचे पहिल्या ५ पर्वाचे विजेते आणि काही स्पर्धक घरात तुफान राडा करताना दिसत आहेत.
शिव ठाकरे, मेघा धाडे , विशाल निकम, उत्कर्ष शिंदे आणि पुष्कर जोग यांच्यानंतर बिग बॉसच्या घरात आता 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणची एन्ट्री झाली आहे. घरात पाऊल ठेवताच सूरजचे आपल्या गुलीगत अंदाजात स्पर्धकांना वेड लावले. विशालसोबत सूरजचे 'झापुक झुपूक' स्टाइल डान्स केला. सूरज चव्हाणसोबत घरात 'बिग बॉस मराठी ५' ची स्पर्धक ड्रामा क्वीन निक्की तांबोळी देखील आली. निक्की घरात येताच तिचा जगप्रसिद्ध डायलॉग "बाई काय हा प्रकार..." जे ऐकून सर्वजण हसू लागतात. निक्की खूपच सुंदर दिसत होती तर सूरज चव्हाण एकद डॅशिंग दिसत होता.
सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळीसोबतच 'बिग बॉस मराठी ४'चा विजेता अक्षय केळकरही घरात धमाकेदार एन्ट्री घेतो. तिघे मिळून घरातील इतर सदस्यांसोबत गेम खेळतात. डान्स करतात. बिग बॉसचे आधीचे स्पर्धक पाहून तन्वी, राकेश, अनुश्री, विशाल आणि दिपाली यांनाही खूप आनंद होतो. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "बाईऽऽऽ... बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळी, अक्षय केळकर, सूरज चव्हाण येणार, खेळ कमाल रंगणार, घरातलं वातावरण झापूक-झूपूक होणार..."
तन्वी कोलते
राकेश बापट
अनुश्री माने
विशाल कोटियन
दिपाली सय्यद
‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी (अक्षय तृतीया) पार पडणार आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. व्होटिंग लाइन्स शनिवार 18 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.