Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' च्या विजेत्याला किती मिळणार पैसा, 'हा' स्पर्धक उचलणार ट्रॉफी?

Bigg Boss Marathi 6 Winner Prize : 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या विजेत्याला किती रुपयांचे बक्षिस मिळणार, जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6 Winner Prize
Bigg Boss Marathi 6 saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या आधीच्या सीझनच्या सदस्यांनी घरात एन्ट्री घेतली आहे.

मिड-वीक एलिमिनेशनमध्ये रेवा कौरासेने घराचा निरोप घेतला.

बिग बॉसच्या विजेत्याला भव्य ट्रॉफीसोबत लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

रितेश देशमुख होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी ६' आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. फक्त २ दिवस ग्रँड फिनालेला उरले आहेत. सर्वत्र फक्त 'बिग बॉस मराठी ६'च्या विजेत्याची चर्चा पाहायला मिळत आहे. विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. १०० दिवसांचा प्रवास संपायला आलाय. कोणाच्या नशिबाचे दार उघडणार हे काही तांसात समजेल. बिग बॉसला या पर्वाचे टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत.

घरात माझी स्पर्धकांची एन्ट्री

'बिग बॉस मराठी ६' ला काही दिवस उरलेले असताना घरात 'बिग बॉस मराठी'चे माझी स्पर्धक आले. यात बिग बॉस मराठी १ ची विजेता मेघा धाडे आणि बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे आणि बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल निकमने घरात धमाकेदार एन्ट्री घेतली. तसेच आधीच्या पर्वाचे सदस्य गायक उत्कर्ष शिंदे आणि पुष्कर जोगही घरात आले. घरातील सदस्यांसोबत त्यांनी मस्त गेम खेळले आणि धमाल-मजा मस्ती केली. आता लवकरच घरात 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण आणि सीझनचे स्पर्धक निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत शोमध्ये दिसणार आहे.

विजेत्याला बक्षीस काय?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळणार आहे.

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  • तन्वी कोलते

  • राकेश बापट

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • दिपाली सय्यद

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी (अक्षय तृतीया) पार पडणार आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल. व्होटिंग लाइन्स शनिवार 18 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

Bigg Boss Marathi 6 Winner Prize
Riteish Deshmukh - Raja Shivaji : "आतुरता महाराजांच्या दर्शनाची..."; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चं अँथम ऐकून छाती गर्वानं फुलून जाईल|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com