The 50 Winner : शिव ठाकरे बनवा 'द 50' चा विजेता; फैजूला हरवून ट्रॉफीवर कोरलं नाव; जिंकले तब्बल ५० लाख रुपये

The 50 Winner - Shiv Thakare : 'द ५०' शोचा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला. या शोचा विजेता महाराष्ट्राचा मुलगा शिव ठाकरे झाला आहे.
The 50 Winner - Shiv Thakare
The 50 Winner saam tv
Published On
Summary

'द ५०' शोचा ग्रँड फिनाले पार पडला.

'द ५०' शोचा विजेता शिव ठाकरे झाला.

'द ५०' शोमध्ये एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते.

सध्या सर्वत्र 'द ५०' (The 50 ) शोची चर्चा पाहायला मिळत आहे. 'द ५०' शोचा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला आहे. या शोचे लाखो चाहते आहेत. या ग्रँड शोचा विजेता महाराष्ट्राचा लेक शिव ठाकरे (Shiv Thakare ) ठरला आहे. शिवने 'द ५०' ची ट्रॉफी उचलली आहे. ट्रॉफीसोबत शिव ठाकरेला तब्बल 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र शिवने हे बक्षीस त्याच्या चाहत्यासाठी जिंकले आहे.

ग्रँड फिनालेला शिव ठाकरेला 'द ५०' या शो चा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. मिस्टर फैसू, काका, रजत दलाल आणि कृष्णा श्रॉफ यांच्याशी स्पर्धा करून शिवने विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली. चाहते आणि कलाकार सोशल मीडियावर शिव ठाकरेला शुभेच्छा देताना दिसत आहेत. या विजयासह, रिअॅलिटी शोच्या विश्वात आपली भक्कम फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

'द ५०' शो जिंकल्यानंतर शिव ठाकरेने चाहत्यांचे आभार मानले. शिवने सांगितले की, "हा विजय जितका माझा आहे, तितकाच तो माझ्या चाहत्यांचाही आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा होत आहे की, माझ्या चाहत्यांपैकीच एक जण ५० लाख रुपयांचे बक्षीस आपल्या घरी घेऊन जाणार आहे. खूप खूप धन्यवाद!" शिव ठाकरेला आता चाहते 'रिॲलिटी शो किंग' म्हणत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'द ५०' शोचा पहिला उपविजेता सोशल मिडिया स्टार मिस्टर फैजू आहे. तर फिटनेस क्वीन कृष्णा श्रॉफने 'द ५०' ची दुसरी रनर-अप ठरली आहे.

रिॲलिटी शो 'द ५०' ची सुरुवात टिव्ही, सोशल मीडिया, क्रीडा, मनोरंजन इत्यादी क्षेत्रातील ५० स्पर्धकांनी केली. शोच्या स्पर्धकांमध्ये करण पटेल, फैसल शेख, दिव्या अग्रवाल, रिद्धी डोगरा, शिव ठाकरे, प्रिन्स नरुला, उर्वशी ढोलकिया, कृष्णा श्रॉफ, नेहल राज लवमा, नेहल इत्यादी लोकप्रिय चेहरे दिसले. 'द ५०' या शो मध्ये हिंदी सोबतच मराठी कलाकार देखील पाहायला मिळाले. यात शिव ठाकरे, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सौरभ घाडगे या कलाकारांचा समावेश होता.

शिव ठाकरे वर्कफ्रंट

शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. तसेच त्याने 'बिग बॉस हिंदी 16'मध्ये उपविजेता पद पटकावले. त्याने आजवर अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. तसेच तो 'रोडीज 15' चा उपविजेता, '"खतरों के खिलाडी 13' चा उपविजेता आणि 'झलक दिखला जा' चा उपविजेता ठरला आहे. शिव ठाकरेचा मोठा चाहता वर्ग आहे.

The 50 Winner - Shiv Thakare
Veen Doghantali Hi Tutena : समर-आनंदच्या मैत्रीतील दुरावा मिटेल का? अखेर स्वानंदीनं सर्वांसमोर आणलं खरं सत्य | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com