'राजा शिवाजी' चित्रपटाचे अँथम रिलीज झाले.
सर्वत्र अजय-अतुलच्या आवाजाचे कौतुक होत आहे.
रितेश देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात पाहून चाहते भावुक झाले.
रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' चे अँथम साँग रिलीज झाले आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याचे नाव 'छत्रपती' असे आहे. गाण्याचे बोल, गाण्यातील नृत्य आणि रितेश देशमुखचा अभिनय पाहून चाहते भारावून गेले आहेत. 'छत्रपती' हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गाण्याचे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा आहे. अजय-अतुल यांना तब्बल ८० गायकांच्या समूहासोबत हे गाणे गायले आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख झळकला आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे. रेमो डिसूझा आणि मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची झलक या गाण्यात पाहायला मिळाली. रितेश देशमुख यांनी गाण्याचा छान व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला त्यांनी खूप खास कॅप्शन दिले आहे. सर्वत्र रितेश देशमुखचे कौतुक होताना दिसत आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि मराठी मातीसाठी!
अजय-अतुल आपल्या सुरांनी सजवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम!
सादर करीत आहोत, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती'
‘हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार‘"
'छत्रपती' या गाण्यावर प्रेक्षक भरपूर प्रेम दाखवताना दिसत आहेत. कमेंट्समध्ये कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. "एक मराठा लाख मराठा", "आतुरता शिगेला दादा...", "छत्रपती राजे" , "आतुरता महाराजांच्या दर्शनाची...", "जय भवानी जय शिवराय" , "अंगावर काटा आला", "अजय अतुल खूप प्रेम तुम्हाला","गाणं पाहून डोळ्यात पाणी आहे", "रितेश भाऊ १ नंबर अभिनय..." अशा भरभरून कमेंट्स गाण्यावर येत आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलियासोबतच आणखी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार झळकले आहेत. चित्रपटात जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.
'राजा शिवाजी' हा भव्य चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.