Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैंकी एक अक्षय्य तृतीया सण सर्वात शुभ मानला जातो.
उद्या म्हणजेच रविवारी अक्षय्य तृतीया सण सर्वत्र साजरा होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने मोठा लाभ होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, पाच राशी माता लक्ष्मीच्या प्रिय आहेत. अक्षय्य तृतीयेत या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे.
राशीचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे या राशीला जन्मलेले लोक मेहनती आणि शांत स्वभावाचे असतात.
कन्या या राशीचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे. या राशीचा चक्र सहा आहे. या राशीत जन्मलेले लोक मेहनती, विश्वासू असतात. कोणतेही नाते प्रमाणिकपणे जपतात.
तुळ राशी शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे. या राशीत जन्मलेले लोक इतरांना मदत करतात. देवी लक्ष्मीच्या आशिर्वादाने त्यांच्या जीवनात प्रगती होते.
कुभ या राशी वायू तत्वाशी संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीची ११ वी रास आहे. या राशीत जन्मलेले लोक स्वावलंबी असतात. मेहनत आणि समाजसेवा करण्याची विशेष आवड असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.