Shocking Video: अवघ्या काही क्षणात झालं होत्याचं नव्हत; विजेच्या तारेला स्पर्श होताच घडले भयंकर; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीला घराच्या अंगणात असताना विजेचा शॉक बसलेला आहे.
Viral Video
Shocking VideoSaam Tv
Published On

Shocking Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी या अपघातात व्यक्तींचा काही क्षणात जीव गमवला जातो, हे अपघात अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतात. सध्या सोशल मीडियावर एका असाच धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात घराच्या अंगणात एका व्यक्तीला विजेचा जोरदार झटका बसलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हा एक बंगलो दिसत असून त्या समोरील संपूर्ण परिसर दिसत आहे. घराच्या अंगणात अनेक व्यक्तींची ये-जा दिसत असून त्यातच एक व्यक्ती हातात काठी घेऊन घराच्या गेटमधून आत प्रवेश करतो. जसा तो व्यक्ती काठी घेऊन आत येतो त्यात त्याला जोरात विजेच्या तारेचा जोरदाक शॉक (Shock)बसतो, याचे कारण की त्या व्यक्तीच्या हात असलेली काठी विजेच्या तारेला लागते त्यामुळे जोरदार शॉक बसतो आणि तो व्यक्ती काही क्षणात जमिनीवर कोसळतो. संपूर्ण घटना घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत(CCTV) कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र तो सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''theghostcamera''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

सर्व धक्कादायक घटना नेटकऱ्यांनी पाहिल्यानंतर हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''खूप खतरनाक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कधीही काही होऊ शकते'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral Video: भरमंडपात नवरीचा धम्माकेदार डान्स मात्र नवरदेवाला आला राग; पुढे जे झाले ते पाहून...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com