

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे जुगाड आणि हटके कल्पनांचा व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. असंच एका तरुणीने फूड ऑर्डर करून डिलिव्हरी बॉयकडे अशी काही मागणी केली की, तो क्षणभर गोंधळून गेला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर होताच व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर स्वीकारल्यानंतर हॉटेलमधून जेवण घेऊन जाताना दिसतो. त्यानंतर तो ज्या तरूणीने जेवण ऑर्डर केलीये तिला पत्ता विचारण्यासाठी फोन करतो. मात्र, फोनवर तरुणी त्याला 'थोडा वेळ थांबा, अजून जाऊ नका,' असं सांगते. डिलिव्हरी बॉय तिच्या सांगण्यानुसार हॉटेलजवळ थांबतो.
काही वेळानंतर एक तरुणी चालत येताना दिसते आणि डिलिव्हरी बॉयला भेटते. त्यानंतर ती म्हणते, 'मी आज ऑफिसवरून लवकर सुटली. तर तुम्ही मला पण सोबत घेऊन चला.” हे ऐकून डिलिव्हरी बॉय काहीवेळ आश्चर्यचकित होतो.
व्हिडिओतील तरुणीने एकाच ऑर्डरमधून दोन उद्देश साध्य केल्याचं पाहायला मिळतंय. ऑफिस सुटल्यावर तिला घरी जाण्यासाठी वेगळी बाईक बुक करावी लागली असती. तसंच घरी गेल्यावर जेवण बनवण्याचा प्रश्नही होता. त्यामुळे तिने फूड ऑर्डर दिली आणि त्याच डिलिव्हरी बॉयसोबत घरी जाण्याची शक्कल लढवली.
हा व्हिडिओ ‘rohitvlogster’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी याला भन्नाट जुगाड म्हटलंय. काही युजर्सनी 'खरंच कमाल आयडिया आहे,' असं, तर काहींनी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
काही कमेंट्समध्ये 'हा प्रकार नियमांनुसार योग्य आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर काहींनी हा मजेशीर प्रकार असल्याचं मत व्यक्त केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.