

लग्न समारंभ म्हटलं की, सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. मात्र एका लग्नात तुफान मारामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या जेवणादरम्यान अचानक सुरू झालेल्या वादातून पाहुण्यांमध्ये खुर्च्यांची फेकाफेक आणि गोंधळ उडाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओमध्ये लग्नाच्या जेवणावेळीचं दृश्य पाहायला मिळतंय. अनेक पाहुणे टेबलावर बसून जेवत असताना अचानक काही लोकांमध्ये शाब्दिक वाद सुरू होतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारं हे भांडण काही क्षणांतच तीव्र स्वरूप घेतं. यावेळी लोक एकमेकांवर खुर्च्या फेकताना या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.
या गोंधळामुळे भर लग्नात मोठा गोंधळ उडतो. काही पाहुणे परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र भांडण इतकं वाढतं की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसतेय. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी झालेल्या या घटनेमुळे उपस्थित पाहुणेही आश्चर्यचकित झाल्याचं दिसून येतंय.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सने यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात. यावेळी एकाने म्हटलंय की, लग्नाच्या वरातीपेक्षा यामध्ये जास्त मजा येतेय. तर अजून एका युजरने म्हटलंय की, लग्नात ठेवलेल्या गोड पदार्थामुळे भांडण झालं असावं.
काही युजर्सने मात्र या घटनेवर टीका करत लग्नासारख्या प्रसंगी शिस्त आणि संयम राखावा असं म्हटलंय. त्यांच्या मते, सोशल मीडियावर अशा व्हिडिओंचं व्हायरल होणं योग्य नाही. ही व्हिडिओतील घटना कुठे घडलीये याची अधिकृत माहिती किंवा भांडणाचे नेमकं कारण समोर आलेलं नाही. परंतु या प्रसंगाने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.