Viral Video: सुस्त नाही तर सुपरफास्ट! स्पीड बोटच्या मागे तुफान वेगाने आली मगर, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

crocodile chasing speed boat viral: नदीत वेगाने धावणाऱ्या स्पीड बोटीमागे मोठी मगर पाठलाग करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
crocodile chasing speed boat viral
crocodile chasing speed boat viralsaam tv
Published On

शांतता हवी असेल तर आपण अनेकदा नदीच्या किंवा तलावाच्या काठी जातो. मात्र कधी कधी त्याच पाण्यात असे काही प्रसंग घडतात जे तुमच्या अंगावर काटा आणतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये असाच एक प्रकार कॅमेरात कैद झाल्याचं दिसतंय. या व्हिडिओमध्ये एक स्पीड बोट वेगाने पुढे जाताना दिसतेय आणि तिच्या मागे मोठी मगर पाठलाग करत असल्याचं दिसतंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

व्हिडिओमध्ये कॅमेरा बोटीच्या मागील दिशेला असल्यामुळे बोटीमुळे पाण्याचा प्रवास दिसून येतोय. काही क्षणांतच त्या लाटांमध्ये एक मोठी मगर दिसते आणि ती पूर्ण ताकदीने बोटीच्या दिशेने पोहत येते. तिचं डोका पाण्याबाहेर असून शरीर पाण्याच्या आत दिसून येतंय. बाजूला उडणारे पाणी आणि मगरीची हालचाल यामुळे हा व्हिडीओ काहीसा काळजाचा ठोका चुकवणारा वाटतो.

crocodile chasing speed boat viral
Viral Video : हद्द झाली राव! धावत्या बाईकवर कपलचा रोमान्स, भरचौकात अश्लील चाळे, गर्लफ्रेंड टाकीवर बसली अन्...

सामान्यतः मगर या सुस्त असतात, असं पण मानतो. मात्र या व्हिडिओने हा समज चुकीचा असल्याचं दिसतंय. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मगर हे पाण्यात अत्यंत वेगाने पोहणारा जलचर प्राणी आहे. शिकार करताना मगरींचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्यातील हालचालींमुळे किंवा आवाजामुळे मगर बोटीच्या दिशेने पोहू शकते.

crocodile chasing speed boat viral
Viral Video: झिंज्या ओढल्या, लोकलमधून खाली खेचलं आणि...! कल्याण रेल्वे स्टेशनवर महिलांच्या डब्यात राडा

हा व्हिडिओ फेसबुकवरील Wildman Adventures या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंटही केलीये. एका युजरने गमतीने म्हटलंय की, 'मगरीतही इंजिन बसवल्याप्रमाणे वाटतंय'.

crocodile chasing speed boat viral
Viral Video: महिलांनी शोरूममधून चोरले अंडरगारमेंट्स, CCTV मध्ये कैद झाली घटना

तर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आले. काही लोकांनी ही मगर हल्ला करण्यासाठी येत होती की फक्त बोटीच्या आवाजामुळे आकर्षित झाली होती याबाबत शंका व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com