Police Viral Video: "तू कोण मला विचारणारा?" सीटबेल्ट लावण्याच्या मुद्द्यावरून पोलिसाचा संताप कॅमेरात कैद, व्हिडीओ व्हायरल

Police Officer: सीट बेल्ट न घातल्याबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर पोलीस अधिकारी आणि नागरिक यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जातेय.
Police Viral Video
Police Viral Videosaam tv
Published On

सीट बेल्ट न घातल्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या एका नागरिकाशी पोलीस अधिकाऱ्याने कथितरित्या अरेरावी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "तू कोण मला विचारणारा?" असं म्हणत संबंधित पोलिसाने नागरिकाशी संवाद साधताना संतप्त झाले होते, असा दावा या व्हिडिओसोबत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या वर्तनाबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून "जनतेचे सेवक की सत्तेची मस्ती?" असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका कारमध्ये बसलेला पोलीस अधिकारी आणि त्याला प्रश्न विचारणारा नागरिक यांच्यातील संभाषण दिसून येतंय. नागरिकाने अधिकाऱ्याला सीट बेल्ट न घातल्याबाबत विचारणा केल्याची माहिती आहे. त्यानंतर अधिकाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया दिल्याचा आरोप केला जात असून, याच संवादाचा व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जातोय.

Police Viral Video
Beed : जावयाचा सोन्याचा 'धोंडा' मांजराच्या पोटात, नेमकं काय झालं? पाहा व्हिडिओ

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी नियमांचं पालन करणं अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलंय. काही सोशल मीडिया युजर्सने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी स्वतःही वाहतूक नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलंय. तर काहींनी संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केलीये.

युजर्सच्या विविध प्रतिक्रिया

दुसरीकडे, काही युजर्सने व्हिडिओचा संपूर्ण संदर्भ समोर येणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. केवळ काही सेकंदांच्या क्लिपवरून निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी घटनेची अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलंय.

Police Viral Video
Viral video: आई सांगत होती ना, दारू पिऊ नका...; दिवंगत वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून मुलीची विचारणा, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ

या प्रकरणाबाबत संबंधित पोलीस विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नसल्याची माहिती आहे. तसंच व्हिडिओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबतही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे व्हिडिओतील दाव्यांची पडताळणी होणं आवश्यक असल्याचं अनेकांचं मत आहे.

Police Viral Video
Viral Video: घरात मुलगा झोपलेला, अचानक बिबट्याची एन्ट्री; आईने कठीण प्रसंगात दाखवलं धाडस, वाचवले सर्वांचे प्राण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com