Shocking Video: मौत को छूकर टक से लौटा! महिलेने अंगावर घातलेल्या गाऊनमध्ये साप अडकला

Scary Viral Footage: सोशल मीडियावर वारंवार अनेक भयभीत करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. बऱ्याचदा हे व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याच पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Scary Viral Footage
Shocking VideoSaam Tv
Published On

Snake Stuck In Dress: साप हा एक असा प्राणी आहे, ज्याला पाहून प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढते. जर हाच साप अचानक कपड्यांच्या आत शिरला, तर भीतीची कल्पनाच करणे अतिशय अवघड आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये चक्क एका महिलेने परिधान केलेल्या गाऊनच्या आत एक साप अडकला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आलेला आहे.

अंगावर परिधान केलेल्या गाऊनच्या आत अडकला साप, महिलेने केला एकच दंगा

व्हायरल होत असलेली ही घटना नेमकी कुठे घडली यासंबंधित स्पष्ट माहिती नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसत असलेला प्रसंग खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता, एक महिला घराबाहेर असलेल्या पायऱ्यांवर गाऊन परिधान करुन बसलेली आहे. पहिल्यांदा तिला काहीतरी विचित्र जाणवतं मात्र काही वेळाने ती जोरजोरात घाबरु ओरडू लागते. कारण तिच्या गाऊनच्या आत चक्क एक जिवंत साप(Snake) शिरलेला दिसून येत आहे.

साप बाहेर काढण्याचा प्रयत्न

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ तुम्हाला एक व्यक्ती महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे शिवाय तिच्या गाऊनमध्ये अडकलेला सापही बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. अथक प्रयत्नानंतर तो व्यक्ती साप बाहेर काढतो. सुदैवाने, तो साप विषारी नव्हता, त्याचमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि इन्स्टाग्रामवरील ''policenama'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला हजारो लाईक्स मिळालेले आहे आणि लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप: सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Scary Viral Footage
Snake Viral Video : बापरे! धावत्या ट्रेनमध्ये सापडला ५ फूट लांब साप; भीतीने प्रवाशांची उडाली धांदळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com