Snake Viral Video : बापरे! धावत्या ट्रेनमध्ये सापडला ५ फूट लांब साप; भीतीने प्रवाशांची उडाली धांदळ

Snake Found in Express : एक साप थेट धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये पोहचला होता. सापाच्या या अनोख्या प्रतापाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Snake Found in Express
Snake Viral Video Saam TV
Published On

जबलपूरहून मुंबईला येणाऱ्या एका ट्रेनमध्ये साप शिरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. धावत्या ट्रेनमध्ये साप दिसल्याने प्रवासी भयभीत झाले. आपला जीव वाचवण्यासाठी सर्वांनी धावपळ सुरू केली होती.

Snake Found in Express
अल्पवयीन मुलं युट्युबवरुन शस्त्रे बनवायला शिकली; केला व्यापार सुरु पलिसांनी घेतलं ताब्यात

मिळेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना जबलपूरहून मुंबईकडे निघालेल्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये घडली. साप समोर आला तेव्हा ट्रेन भुसावळ आणि कसारा स्थानकाच्या मध्ये पोहचली होती. अचानक प्रवास करणाऱ्या व्यक्तीची नजर समोर असलेल्या रॉडवर पडली. रॉड पाहताच त्यावर एक साप असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

या व्यक्तीचं सापावर लक्ष जाताच तो साप साप ओरडू लागला होता. साप असं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. तसेच व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी वाट मिळेल तिकडे पळू लागतात. मात्र यावेळी साप ट्रेनमध्ये होता. ट्रेनमध्ये धावण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच धांदळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच काही अन्य प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचली आणि ट्रेन थांबवण्यात आली.

पुढे घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि निसर्ग अधिवासात सोडले आहे. साप बाहेर काढल्यावर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण कोच देखील चेक केला. त्यावेळी कोचमध्ये काहीही धोका नसून प्रवाशी सुखरूप प्रवास करू शकतात असे सांगितले.

साप बाहेर काढल्यावर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण कोचची शहानिशा केल्याने येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. तसेच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडत आपल्या ठिकाणी प्रवास केला. साप थेट ट्रेनमध्ये शिरलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उपस्थित प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Snake Found in Express
PM मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, एकमेकांवर पडले कार्यकर्ते; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com