Mumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये एकविरा आईचा उदो उदो...खचाखच भरलेल्या गर्दीत महिलांनी धरला ठेका; पाहा VIDEO

Viral Video : मुंबई लोकलमधील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात दिवसभराचा कामाचा थकवा घालवत महिलांनी मराठी गाण्यावर जोरदार ठेका धरला आहे.
Viral Video
Mumbai Local TrainSaam Tv
Published On

दिल्ली मेट्रोनंतर मुंबईची लोकल ट्रेन सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरत असते. कधी प्रवाशांच्या गर्दीने भरलेली गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात,तर कधी धावत्या लोकलमध्ये हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात धावत्या लोकलमध्ये महिलांनी थेट भरलेल्या गर्दीत आगरी-कोळी गाण्यावर जोरदार ठेका धरला आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे

Viral Video
Viral Video: सुरेल आवाज अन् पायाने ढोलकी वादन; गणपतीचं हे गाणं ऐकून मंत्रमुग्ध व्हाल - Video

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील दिसत असून शिवाय लेडीज कंपार्टमेंटमधील आहे. यात महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय. काही महिला बसलेल्या आहेत तर काही जागा न मिळल्याने उभ्या आहेत. काही वेळातच या लेडीज कंपार्टमेंटध्ये मोठ्या आवाजात आगरी- कोळी गाणी वाजण्यास सुरुवात होते,मग काय गाण सुरु होताच काही महिला गर्दीत डान्स(Dance) करण्यासाठी उभ्या राहतात आणि जोरदार गाण्यावर ठेका धरत डान्स करु लागतात.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @sawantvibhuti911 या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,' खूप जुना व्हिडिओ आहे'. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत.

टीप : हा व्हिडीओ (Video)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral Video : अरे बापरे! उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर आढळली ७ फूट महाकाय मगर; VIRAL VIDEO पाहून उडतील प्रत्येकाचे होश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com