Dance Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video : सासू-सून जोमात, डान्स पाहून नेटकरी कोमात; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही बघितलाय का?

Dance Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात आजही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात एका सासू-सूनेच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत.

Dance Viral Video
Viral Video : अरे बापरे! उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर आढळली ७ फूट महाकाय मगर; VIRAL VIDEO पाहून उडतील प्रत्येकाचे होश

कधी घराबाहेर कचाकच भांडणाना सासू-सूनेचे व्हिडिओ व्हायरल(Viral) झाले आहेत तर अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेंकीसोबत ताल लावून डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात,सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल ज्यात सासू-सूनेचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(VIDEO) सुरुवातीस, एक आजी दिसून येत आहेत. या आजींनी लाल रंगांची साडी नेसलेली असून त्या गाणं सुरु होताच डान्स करण्यास सुरूवात करतात मात्र काही वेळात त्यांच्या पाठीमागून त्यांची सून येते आणि त्याही सासूसोबत गाण्यावर धम्माकेदार डान्स केला आहे.आजींच्या डोक्यावर पदर दिसून येत आहे. डोक्यावरचा पदर सावरत आजींनी सूने सोबत डान्स केला आहे. मराठी गाणं नाही तर दोघींनी 'बंबई से गई पूना' या हिंदी गाण्यावर धम्माकेदार डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@nakti_family0803'या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करताच कॅप्शनमध्ये 'सासू सूनेचा डान्स' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ९ हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंटमध्ये सुंदर डान्स असे इमोजी नेटकरी वर्गाने दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Dance Viral Video
Viral Video : लहान मुलाचा हलगीवर जबरदस्त ठेका; मित्रासोबत केला लय भारी डान्स, कोल्हापुरातील चिमुकल्यांचं सर्वत्र कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com