Viral Video: कहरच केला! भर मांडवात नवरदेवाचा सुटला संयम; VIDEO पाहताच भडकले नेटकरी

Wedding Viral Video: सध्या सर्व ठिकाणी लग्नसमारंभाचा हंगाम असल्याचे आपल्याला दिसत आहे. आज असाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवर देवाच्या वागणुकीवर नेटकरी संताप व्यक्त केला आहे.
Wedding Viral Video
Wedding Viral VideoSaam Digital

Wedding Viral Video

सध्या सर्व ठिकाणी लग्नसमारंभाचा हंगाम असल्याचे आपल्याला दिसत आहे. अनेक लग्नातील धमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागले आहेत. कधी नवरी मुलगी डान्स करत स्टेजवर येते तर कधी नवरा मुलगा डान्स करत नवरीला स्टेजवर आणतो. असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज असाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवर देवाच्या वागणुकीवर नेटकरी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, नवरदेव आणि नवरीमुलगी स्टेजवर उभे आहेत. नवरदेवाच्या हातात फुलांची माळ आहे. त्यांच्या आजूबाजूला स्टेजवर अनेक वऱ्हाडी मंडळी आहेत. अशातच नवरदेव नवरीच्या कानात काही तरी सांगत असतो, त्यावर नवरी नाही बोलते. तिने नाही बोल्यावर तो नवरीच्या गळ्यात हार घालत नाही.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wedding Viral Video
Viral Wedding Video: कहरचं केला! एकाच मंडपात पठ्ठ्याने ४ तरुणींशी बांधली लग्नगाठ; व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले

अशात नवरदेव पटकन असे काही करते ज्यामुळे नववधू लाजू लागते. वर वधूच्या जवळ जातो आणि तो तिच्या गालावर चुंबन घेतो. हे पाहून मंडपातील सर्व लोकांना हसू येतं.

व्हायरल व्हिडिओ @ChapraZila या एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. नक्की हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकले नाही.

व्हिडिओ व्हायरल होताच काही नेटकऱ्यांच्या भन्नाट तर काही नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'अगदी लग्नासारख्या गोष्टींचीही चेष्टा करण्यात आली आहे'. तर आणखी एका यूजरने लिहिलंय की,'काय वेडेपणा'.व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून विविध सोशल मीडियावर शेअरही करण्यात येत आहे.

Wedding Viral Video
Viral Wedding Video: अरेरे.. रोमँटिक फोटोशूट करायला गेले अन् भलतचं घडलं, भर मंडपात नवरा- नवरीची फजिती; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com