Viral Wedding Video
Viral Wedding VideoSaamtv

Viral Wedding Video: अरेरे.. रोमँटिक फोटोशूट करायला गेले अन् भलतचं घडलं, भर मंडपात नवरा- नवरीची फजिती; VIDEO

Trending Viral Video: या व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नातील फोटोशूटवेळी नवरा- नवरीची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे.
Published on

Bride Groom Viral Video:

लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम. आयुष्यातील हा खास क्षण अविस्मरणीय व्हावा, असे प्रत्येक तरुण- तरुणीला वाटते. ज्यासाठी प्रत्येकजण हटके स्टाईल शोधत असतो. अलिकडच्या काळात लग्नात फोटोशूटची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. एकापेक्षा एक हटके पोझ देत लग्नात नवरा- नवरी फोटोशूट करत असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नातील फोटोशूटवेळी नवरा- नवरीची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, जाणून घ्या सविस्तर..

लग्न सोहळ्यात (Wedding Video) घडणाऱ्या अनेक गमती- जमतींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी नवरदेवाची हटके एन्ट्री, कधी नवरीचा भन्नाट डान्स तर कधी मित्रमंडळीच्या करामती नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या एका लग्न सोहळ्यातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये लग्नात फोटोशूट करत नवरा- नवरी पोझ देत आहेत. अचानक नवरदेवाचा तोल जातो अन् दोघेही जोरात आदळतात. भर मंडपात झालेल्या या फजितीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हॉलमध्ये लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. लग्नाच्या पोषाखात सजलेले वर- वधूंचे फोटोशूट सुरू आहे. आता फोटोशूट म्हणलं की एकापेक्षा एक हटके, नवीन पोझ द्यायला लागतात. अशीच एक रोमँटिक पोझ देताना दोघांची फजिती होते.

फोटो काढण्यासाठी नवरा- नवरीला गोल फिरवतो आणि पोझ द्यायला सांगतो. पण यावेळी पोझ देताना नवरदेव धाडकन खाली पडतो. त्याच्यासोबत नवरीही खाली कोसळते. या मजेशीर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Wedding Video
Sharmila Thackeray News : ...तर तुमची बायकाेच तुमचे लाेणचे करेल : शर्मिला ठाकरे

जयपुर वेडिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत तब्बल ६० मिलियनपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी कसल्या कसल्या पोझ द्यायला लागतात राव? असे म्हणत त्यांच्या फोटोशूटची खिल्ली उडवली आहे. तर काही नेटकऱ्यांनी नको तसली स्टाईल कशाला पाहिजे? असे टोमणेही कमेंट्समधून मारले आहेत. (Latest Marathi News)

Viral Wedding Video
Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज सातारकरांचे स्मारक राज्य सरकार उभारेल : देवेंद्र फडणवीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com