
Women Dance Video: सोशल मीडियावर दररोज अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हायरल व्हिडिओ हृदयाला भिडतात, तर काही अगदी मनोरंजनाने भरलेले असतात. सध्या अशाच एका भन्नाट व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडिओमध्ये काही आजींनी बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे. त्यांच्या ठेक्याने आणि उत्साहाने नेटकरी अक्षरश: फिदा झालेले आहेत.
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत चार महिला दिसत आहे. सर्व महिला एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक महिलेच्या स्टेप्स आणि उत्साह व्हिडिओमध्ये पुरेपुर दिसत आहे. या वयातही केलेला असा डान्स पाहून प्रत्येकजण यांचे कौतुक करत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या
thelotusshakti या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हजारो लाईक्स आणि व्ह्यूज दिलेले आहेत. शिवाय अन्य सोशल प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेला आहे.
सर्व आजींचा डान्स (Dance) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भरभरुन कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कमाल केली'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''उत्साह सर्व तरुणाईला लाजवेल असा आहे'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''मस्तच'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.