Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: रिल्सचे वेड आले अंगाशी; रेल्वेरुळावर स्टंट करण्यास गेला अन् मध्येच अडकला; पुढे काय झाले ते पाहा

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या जयपूरमधील एका स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.
Published on

Stunt Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम बाईक स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. बाईक स्टंट करताना अनेकदा तरुण-तरुणींना जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही तरुणांचे धोकादायक स्टंट थांबण्याचे नाव घेत नाही, सध्या सोशल मीडियावर असाच एका स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वे रुळावर स्टंट करणे एका व्यक्तीच्या जीवानिशी आलेले आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत रेल्वे रुळाचा संपूर्ण परिसर दिसत आहे. रेल्वे रुळावर अनेक नागरिकांनी गर्दी केलीली आहे शिवाय या रेल्वे रुळावर एक थार कार आहे, मात्र ही कार अडकलेली आहे. या गर्दीत अनेक पोलिसही आहेत. व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर एक व्यक्ती रेल्वे रुळावर अडकलेली कार काढण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळात तो व्यक्ती अडकलेली कार काढण्यात यशस्वी होतो आणि तेथून कारसह पळ काढतो आणि संपूर्ण जनता घडत असलेली घटन पाहत असतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जयपूरमधील असल्याचे समजत आहे. मात्र संपर्ण घटना तिथे असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्याक कैद केलेला आहे.

स्टंटचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये,''जयपूरमध्ये, काही लोक एक थार भाड्याने घेऊन थेट रेल्वे ट्रॅकवर स्टंट करत होते'' असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी व्हिडिओला लाईकही केलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेट्सबॉक्समध्ये लिहिले आहे की,बाई काय हा प्रकार'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''पोलिस फक्त पाहत आहेत'' तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Shocking Viral Video: धक्कादायक! महिलेने आवडीने मागवले छोले-भटुरे, खाताना भटुरेमध्ये आढळली मेलेली पाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com