Shocking Viral Video: धक्कादायक! महिलेने आवडीने मागवले छोले-भटुरे, खाताना भटुरेमध्ये आढळली मेलेली पाल

Food Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी थरारक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी खाण्याचे व्हिडिओ असतात.
Food Viral Video
Shocking Viral VideoSaam Tv

देशाची राजधानी दिल्ली असलेल्या दिल्लीमध्ये रोज काहीना काही घडत असतं. आजवर फक्त दिल्ली मेट्रोतील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत आलेत. कधी या दिल्ली मेट्रोमध्ये कपल रोमान्स करताना दिसतात तर कधी भांडताना दिसतात. मात्र अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दिल्ली नेहमीच चर्चेत असते.

Food Viral Video
Times Square Viral Video: सातासमुद्रापार सुप्रिया सुळेंची चर्चा! टाईम्स स्क्वेअरवर झळकले विजयाचे बॅनर; VIDEO VIRAL

आता असाच दिल्लीतील व्हिडिओ व्हायरल होतोय मात्र हा व्हायरल व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील नाहीये. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा फुडी लोकांसाठी आहे. कारण दिल्लीतील एका ठिकाणी खाण्याच्या पदार्थांमध्ये चक्क पाल आढळून आलेली आहे. सध्या या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, दिल्लीच्या(Delhi) रस्त्यालगत छोले भटूऱ्यांचा स्टोल आहे. या ठिकाणी अनेक खाद्यप्रेमी छोले भटूऱ्यांचा आस्वाद खाण्यासाठी आलेले आहेत .त्यातच येथे आलेल्या एका महिलेनेही छोले भटूरे खाण्यास मागवले मात्र छोले भटरे ती खाण्यास जाणार तो पर्यत तिला त्यात मेलेली पाल दिसून येते. यानंतर महिला त्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल व्यक्तीशी भांडताना दिसते.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वरील 'घर के कलेश' @gharkekalesh नावाच्या सोशल हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणा लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोकं सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. या आधीही अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांमध्ये पाली किंवा झुरळ सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही आजही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.

Food Viral Video
Girls Fight Viral Video: केस ओढले, लाथा-बुक्क्या मारल्या; पार्कमध्ये तरुणींची जबरदस्त हाणामारी;VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com