Viral Video: भीषण वास्तव! इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी पैसे नाहीत तरुणाने केली तब्बल ५४ मोबाईलची चोरी; घटनेचा CCTV व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका मोबाईल शॉपमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Panvel Viral Video: जगभरात असलेल्या प्रत्येकाला शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. सोशल मीडियावर आपण शिक्षणासाठी मेहनत घेत असलेल्या अनेक व्यक्तीच्या गोष्टी पाहतो. मात्र सध्या या संदर्भात एका तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने चोरी करण्याचा मार्ग निवडला आहे. ज्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुण एका मोबाईल दुकानाच्या बाहेर उभा आहे आणि मध्य रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने(Shop) बंद दिसत असून दुकानाबाहेरील परिसरात तो एकटाच दिसत आहे.

प्रकरण नेमके काय?

संपूर्ण घडलेली घटना पनवेल शहरातील असून चोरी करणारा हा तरुण महाविद्यालयीन तरुण आहे. सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेने सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करत एका युवकाला चोरी केल्याप्रकरणी अटक केली. मात्र जेव्हा त्याला चोरी करण्याचे कारण विचारले असता त्याने,इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असून महाविद्यालयाची फी भरण्यासाठी त्याने मोबाईल शॉप दुकानात चोरी केल्याचे कबूल केलेय. पोलिसांनी चोरट्याकडून 41 मोबाईल जप्त केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हिडिओत दिसणारा तरुणाने ओळख पटू नये म्हणून डोक्यात हेल्मट घातलेले आहे, अशात तो एका वस्तूने दुकानाचे लोखंडी गेट उघडण्याचा प्रयत्न करतो काही वेळात तो त्यात यशस्वी सुद्दा होतो आणि दुकानात प्रवेश करतो व्हिडिओत पुढे पाहिले तर तरुण एका मोठ्या पिशवीत दुकानातील मोबाईल भरत आहे. तरुणाने केलेल्या चोरीची घटना दुकानाबाहेर आणि दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''Saamtv'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी युवकाने केली 54 मोबाईलची चोरी'' असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत असून लाखोच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Video: OLA इलेक्ट्रीक स्कुटर दुरूस्तीला टाकलेल्या ग्राहकाला 90 हजारांचे बील, ग्राहकाने जे केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com