ST Driver Video: दारुच्या नशेत तर्राट होऊन चालवली एसटी; प्रवाशांच्या जीवाचे हाल; VIDEO व्हायरल

Drunk ST Driver Viral Video: बदलापूरातील एसटीचालकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एसटी चालक दारुच्या नशेत बस चालवताना दिसत आहे.
ST Driver Video
ST Driver VideoSaam Tv
Published On

बदलापूरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापुरात एका एसटी चालकाने चक्क दारुच्या नशेत एसटी चालवली आहे. दारुच्या नशेत त्याने प्रवाशांनी भरलेली एसटी चालवली आहे. त्यामुळे एसटीत बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापुरातील या एसटीचालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसटीतील काही प्रवाशांनी व्हिडिओ काढला आहे. यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा चालकच दारुच्या नशेत होता. दारुच्या नशेत असतानाही तो जोरात एसटी चावलत होता. त्यामुळे एसटीतील प्रवाशी घाबरल्याचे दिसत होते. (ST Driver Viral Video)

ST Driver Video
Viral Video: कबड्डीच्या मैदानातच रंगला आखाडा; पोरी नाही तर पोरांनी एकमेकांना कुटले; पाहा VIDEO

बदलापूर डेपोतून (Badlapur Viral Video) दुपारी साडेतीन वाचता बदलापूर ते कुडेरान एसटी रवाना झाली. या एसटीचा ड्रायव्हर दारुच्या नशेत होता. बदलापूर शहराच्या बाहेर पडताच एसटी चालकाने बेदकारपणे आणि अतिवेगाने बस चालवायला सुरु केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी बस हळू चालवण्यास सांगितले. परंतु एसटी चालकाने बस तर काही हळू चालवली नाही याउलट प्रवाशांची हुज्जत घातली.

बसच्या अतिवेगामुळे दोन ते तीन वेळा बस रस्त्याच्या खाली गेली होती. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. बसमधील एका प्रवाशांना बस चालकाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओत तुम्ही अशी कशी एसटी चालवतात, असे अनेक प्रश्न प्रवाशांनी विचरले आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार असून संबंधित एसटी चालकावर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जात आहे. (Drunk ST Driver Viral Video)

ST Driver Video
Viral Video: मार्केटमध्ये आलं लाडक्या बहीणी योजनेवर गाणं; Viral Video पाहिलात का?

जर एसटी कर्मचारीच दारुच्या नशेत बस चालवत असतील तर एसटीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारे जर एसटी चालकानेच हलगर्जीपणा केला तर प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

ST Driver Video
Viral Video: बाबोsss...! नखं आहेत की काठी? सर्वात लांब नखं असलेली महिला पाहिलीत का? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com