Viral Video: मार्केटमध्ये आलं लाडक्या बहीणी योजनेवर गाणं; Viral Video पाहिलात का?

Viral Video News: सोशल मिडियावर सध्या लाडकी बहीण योजनेवर तयार केलेल्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय तरी काय आहे ते व्हायरल व्हिडिओतून पाहा.
Ladki Bahin Yojana Song
Viral VideoSaam Tv
Published On

Ladki Bahin Yojana Song: सध्या राज्यभरातील प्रत्येक महिला लाडकी बहीण योजनेमुळे अत्यंत खुष आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गाला खूप फायदा झालेला असून त्याच दुसऱ्या बाजूला या योजनेवरुन राजकारणात वाद-प्रत्यारोप सुरु आहे. मात्र सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेवर अनेक गंमतीदार प्रतिक्रियापासून ते अनेक गंमतीदार व्हिडिओही पाहण्यास मिळत आहे. त्यातच सोशल मीडियावर चक्क लाडकी बहीण योजनेवर गाणं आलेले आहे. या गाण्याला चक्क अहीराणी तडखा दिलेला आहे.

व्हायरल (Viral) गाणं इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले आहे. या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला तीन वेगवेगळे भाग दिसत आहेत. पहिल्या भागात काही महिला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दाखवल्या आहेत तर दुसऱ्या भागात काही महिला डान्स करत आहेत तर तिसऱ्या भागात नाराज असलेल्या भावासमोर पैसे मिळाल्याने लाडक्या बहीणी डान्स(Dance) करत आहेत.

यानंतर व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता काही महिला एका परिसरात काही महिला समोर डान्स करत आहेत आणि म्हणत आहेत की,'''लाडक्या भाऊ न्या लाडक्या बहिणी''. असे या गाण्याचे बोल आहेत. सर्व गाण्याला ''अहीराणी'' संगीत जोडलेले आहे, त्यामुळे या गाण्याला वेगळीच धुन आलेली आहे. सध्या सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

लाडकी बहीण योजनेवर होत असलेल्या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असूत तो ''@mr_akash_mahajan'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''लाडक्या भाऊ न्या लाडक्या बहिणी'' असे लिहिण्यात आलेले आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच आतापर्यंत व्हिडिओला १८ हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि अजूनही व्हिडिओचे व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत आहे.

व्हायरल होत असलेल्या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील प्रत्येक यूजर्संच्या मोठ्या संख्येने पसंतीस आलेला दिसत आहे, त्यामुळे व्हिडिओवर बऱ्याच संख्येने प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच गाणं'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''लोक काय करतीस सांगता येत नाही'' तर काहींनी अहिराणी भाषेत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया,''तुम्ही आसा गाना काढले लागी गयात ती योजना आज बंद पाडी टाकी''अशी आहे, अशा बऱ्याच प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Ladki Bahin Yojana Song
Viral Video: रीलचे वेड तरुणाच्या अंगलट...! धबधब्यावर असताना पाय घसरला अन्; पुढे जे घडलं ते भयंकरच; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com