Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते देव नदीचे जलपूजन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 11 October 2024: आज शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, शिवसेना दसरा मेळावा, पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Nashik News: नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते देव नदीचे जलपूजन

नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देव नदीचा जलपूजन

- अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात आज अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका

- उपमुख्यमंत्री अजित पवार सिन्नरच्या देवपूर गावात पोहचले, अजित पवार करणार जलपूजन, त्यांनतर शेतकरी मेळावा घेणार

Delhi News: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि चंद्रकांत पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि चंद्रकांत पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद

नॅशनल इन्स्टिट्यूट ॲड इलेक्ट्रॉनिक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एमओयू साईन

रोबोटिक्स क्षेत्रामध्ये संशोधन करण्यास मदत होणार

Mumbai News: विधानसभा निवडणुकीआधी दोन्ही ठाकरे साधणार जनतेशी संवाद

विधानसभा निवडणूक आधी दोन्ही ठाकरेंचा जनतेशी संवाद

राज ठाकरे साधणार जनतेशी संवाद

शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्या आधी राज ठाकरे हे देखील जनतेशी बोलणार.

पॅाडकॅास्ट आणि सोशिअल मिडीयाच्या माध्यमातून राज ठाकरे संवाद साधणार..

उद्या सकाळी राज ठाकरे पॅाडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार...

तर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा

Palghar News: विवेक पंडित चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारांवरच झोपले

श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारांवरच झोपले

राज्यमंत्री दर्जा असलेल्या विवेक पंडित आंदोलनकर्त्यांसोबत आंदोलनात सामील

मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची आंदोलन कर्त्यांची चेतावणी

श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवसापासून सत्याग्रह आंदोलन सुरू

कुख्यात डॉन अबू सालेम याला भेटण्यासाठी आलेल्या दोघांची चौकशी सुरू

कुख्यात डॉन अबू सालेम याला भेटण्यासाठी आलेल्या दोघांची चौकशी अद्यापही सुरूच

सदर महिलेची आणि परदेशी नागरिकांची गेल्या 18 तासापासून सुरू आहे चौकशी

नाशिक एटीएस पाठोपाठ मुंबई आणि पुणे एटीएस देखील या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती आहे

सदर महिला ही अबू सालेम याच्याशी परिचित आहे मात्र जो परदेशी व्यक्ती भेटला आहे तो नेमका कोण आहे त्याचा तपास केला जात आहे

Mumbai News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून गोपनीय सर्वेक्षण

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून गोपनीय सर्वेक्षण

२८८ विधानसभा मतदारसंघापैकी १३० जागांवर काँग्रेसकडून सर्वेक्षण

राज्यातील ज्या जागांवर विजयाचा विश्वास काँग्रेसला आहे त्या ठिकाणी हे सर्वेक्षण

दिल्ली आणि बेंगलोर मधून आलेल्या कंपनीकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे

सर्वेक्षणाचा अहवाल काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवला जाणार

सर्वेक्षणातून उमेदवारांचे इलेक्टिव्ह मेरिट येणार पुढे

 Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

कजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची आता जय्यत तयारी सुरू आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील भगवान भक्ती गडावर हा दसरा मेळावा होणार आहे. 10 वर्षापासून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होतोय, तर यंदाच्या या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे हे देखील उपस्थिती लावणार आहेत. यामुळे या मेळाव्याच्या तयारीला अधिकच वेग आलाय. भव्य दिव्य मैदानात हा मेळावा होत असून या मैदानाची स्वच्छता आता युद्ध पातळीवर सुरू आहे

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लडाऊ विमानाची लॅन्डिंग आणि टेक ऑफची चाचणी होणार

आचारसंहितेआधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या धावपट्टीवर वायूदलाचं पहिलं विमान लॅन्ड होणार.

लडाऊ विमानाची लॅन्डिंग आणि टेक ऑफची चाचणी होणार.

वायूदलाच्या सुखोई विमानाचं उड्डाण.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

Maharashtra Government: सरकारच्या वतीने एकाच दिवसांत 194 शासन निर्णय काढण्यात आले

विधानसभा निवडूनसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता होऊ शकते लागू

याच पार्श्वभूमी व सरकारच्या वतीने एकाच दिवसांत 194 शासन निर्णय काढण्यात आले आहेत

आज नेमके किती शासन निर्णय काढण्यात येणार कडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Kolhapur News: २८ किलो गांजा कोल्हापूर पोलिसांनी केला जप्त

२८ किलो गांजा कोल्हापूर पोलिसांनी केला जप्त

राजाराम तलाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना केली अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सणासुदीच्या काळात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

धुळ्याचा निहाल शेख आणि साताऱ्यातील चरण शिंदे राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

२८ किलो गांजा सह ५ लाख ६८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mumbai News: विधानसभेसाठी महायुतीत अजूनही काही जागांवर तोडगा काढण्याचे काम सुरू

विधानसभेसाठी महायुतीत अजूनही काही जागांवर तोडगा काढण्याचे काम सुरू

विश्वसनीय सूत्रांनी दिली माहिती

येत्या ४ ते ५ दिवसात दिल्लीत तीन प्रमुख नेत्यांची पुन्हा बैठक

महायुतीत जवळपास ८० टक्के जागावाटप पूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या विद्यमान आमदारांच्या जागा कायम राहण्याची शक्यता

पक्षाला मिळणाऱ्या इतर जागांवर महायुतीत समन्वय साधून उमेदवार दिला जाणार, सूत्रांची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com