
Dangerous Stunt Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेकदा धोकादायक स्टंट पाहण्यासाठी मिळतात.त्यातच एक असाच प्रकार समोर आला असून,एका तरुणाने बाईकवर बसून जीवघेणा स्टंट करत बाईक चालवली.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून लोकांनी या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण रस्त्यावरुन बाईक चालवताना दिसतो.रस्त्यावरुन वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असताना त्यामध्ये हा तरुण बाईक चालवत स्टंटबाजी करताना दिसत आहे.ज्यामध्ये तो अतिशय वेगाने बाईक चालवक आहे शिवाय हेल्मेट न घालता इतर वाहनांमधून वाकडी-तिकडी बाईक चालवत असतो.हद्द तर तेव्हा होते तो तरुण एका व्यक्तीला धडकणार होता,मात्र थोडक्यात बचावला जातो.
स्टंटबाजीचा व्हिडिओ एक्सवरील ''Indian Observer'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हजारो संख्येने लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.तर अन्य काही यूजर्संनी व्हिडिओला अन्य माध्यमांवर शेअरही केलेला आहे.
तरुणाचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.मात्र त्यातील एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे,''पोलिसांची भिती तरुणांना का वाटत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''चांगलाच पोलिसांनी चोपला पाहिजे'' तर अशा अनेक रागीट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.