

सध्या संपूर्ण देशभरात पेट्रोल-डिझेलची टंचाई होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात इंधनटंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्येवर एका तरूणाने काढलेला अनोखा उपाय व्हायरल झालाय.
पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी आणि इंधनाचा तुटवडा पाहून या तरूणाने आपली बुलेट बाइक सोडून थेट घोड्यावरून ऑफिस गाठलंय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्याच्या देसी जुगाडचं कौतुक करतायत.
देवासमधील हा युवक बँकेत काम करतो. नेहमीप्रमाणे तो त्याच्या बाइकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला. मात्र तिथे लांब रांगा पाहून त्याला बराच वेळ थांबावं लागलं. शेवटी वेळ वाया जाऊ नये म्हणून त्याने वेगळा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला.
या तरूणाने तत्काळ त्याची बाइक बाजूला ठेवली आणि घोड्याची व्यवस्था करून त्यावर स्वार होत थेट ऑफिसकडे निघाला. शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर घोड्यावरून जाताना त्याला पाहून नागरिकही आश्चर्यचकित झाले होते. काहींनी हा अनोखा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी युवकाच्या कल्पकतेचं कौतुक केलंय. काहींनी याला 'खरा देसी जुगाड' असं म्हटलंय. तर काहींनी 'कठीण परिस्थितीत भन्नाट मार्ग' अशी कमेंटही केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.