

सध्या भारतात अनेक ठिकाणी एलपीजी गॅसचा तुटवडा सहन करावा लागतोय. गॅस मिळवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लोकांच्या रांगाही लागल्यात. घरातील गॅस संपू नये यासाठी लोक इतर पर्यायांचाही वापर करतात. अशातच आता सोशल मीडियावर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे सहज ओळखण्याचा एक उपाय सांगणारा व्हिडिओ प्रमाणात व्हायरल होतोय.
इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये ओल्या कापडाच्या मदतीने सिलेंडरमधील गॅसची पातळी तपासता येते, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे नेटिझन्समध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही निर्माण झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सिलेंडरवर पूर्णपणे ओल्या कापडाने पुसण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर काही वेळ गेल्यावर सिलेंडरचा जो भाग लवकर सुकतो आणि जो भाग ओला राहतो त्यावरून गॅसची पातळी ओळखता येते, असा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओनुसार, जो भाग ओला राहतो, तिथपर्यंत गॅस शिल्लक असल्याचं मानलं पाहिजे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील ‘salve_6717’ या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी बातमी लिहेपर्यंत त्याला जवळपास 1 लाख 96 हजार लाईक्स मिळालेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने 'पाइपन गॅस घेतला की सगळ्या त्रासातून सुटका होते,' असं म्हटलंय. तर दुसऱ्या युजरने 'गॅस संपूर्ण सिलेंडरमध्ये समान पसरलेला असतो, तो खाली बसत नाही,' अशी शंका व्यक्त केली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरमध्ये द्रव आणि वायू अशा दोन्ही स्वरूपात गॅस असतो आणि त्याची पातळी बाहेरून पाहून ओळखणं कठीण असतं. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडिओतील उपायांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. अधिकृत पातळीवर गॅसची शिल्लक तपासण्यासाठी वजन किंवा प्रमाणित उपकरणांचा वापर अधिक अचूक मानला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.