Viral Video: जिंकलंस भावा! रेल्वे स्टेशनवर रिल काढत होता, धावत्या रेल्वेतून आजोबाचा पाय घसरला, पुढे जे झालं ते तुम्हीच पाहा..

Viral Video: सध्याच्या तरुणांमध्ये रिल बनवण्याचे वेड लागलेले आहे. अनेक धोकादायक ठिकाणी रिल बनवले जातात. मात्र सध्या एका रिलच्या नादात एका व्यक्तीचा जीव वाचला गेला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

गेल्या अनेक महिन्यापासून रिल बनवताना बऱ्याच व्यक्तींना आपले जीव गमवावे लागले आहेत. सोशल मीडियावर त्या संपूर्ण घटनेचे थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले आहेत. कधी उंच टेकडीवर तोल जाऊन तर कधी धबधब्यावर पाण्याचा वेग अधिक झाल्याने अशी ही कारण होती. तरीही अशा घडना घडूनही रिल काढणे व्यक्तींचे थांबले नाही. पण तुम्ही कधी रिल काढल्याने कोणाचा जीव वाचला गेला आहे असे ऐकले आहे का? परंतू सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे ज्यात, एका तरुण रेल्वे ट्र्रॅकच्या येथे रिल काढत असताना एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला गेला आहे.

सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्यक्ती रेल्वे रुळावर तर कधी रेल्वे स्टेशनवर रिल व्हिडिओ बनवताना दिसतात. अनेकदा हे रिल बनवताना अनेकांना रेल्वेचा जोरदार मार लागला आहे तर कधी रिल बनवताना रेल्वेच्या धडकेत जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी रिल किंवा डान्स करण्यास शक्त परवानगी नसून सुद्धा अनेकजण असे करतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला तरुणानही रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिल बनवत होता. मात्र त्याच्यामुळे रेल्वेतून (Railway) खाली पडलेल्या वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला गेला आहे.

काय घडलं?

व्हायरल (Viral) व्हिडिओत तुम्हाला एक तरुण आहे जो डान्स करताना दिसून येत आहे. जो की एका रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर आहे. तरुण डान्स करत असताना त्याच्या बाजूवरुन एक रेल्वे जात आहे. रेल्वेच्या दरवाजावर उभी राहिलेले प्रवाशी तरुणाचा डान्स पाहत जात आहेत. मात्र तरुण डान्स करत असताना धावत्या रेल्वेमधून एक वृद्ध व्यक्ती उतरत असतात मात्र धावत्या रेल्वेतून उतरत असताना त्यांचा तोल जातो आणि ते जमिनीवर पडतात. परंतू रिल (Reel) बनवत असलेला तरुण त्या वृद्ध व्यक्तीला सावरुन घेतो. व्हिडिओ पाहून नक्की तुम्ही म्हणाल की, ''वाचवणारा कोणता रूपात येईल सांगता येत नाही''.

प्रतिक्रिया

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरीलcrazziee_stuff's या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओतील प्रसंग पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओला अनेक हजारांच्या घरात पसंती दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''देवाला सुद्धा काळजी'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''तरुणाला दोष दिलेला आहे'' मात्र जास्त प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ज्यात अनेक यूजर्संनी तरुणाचे कौतुक (Curiosity) केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral Video: पती-पत्नी पुराच्या पाण्यात अडकले, कारच्या छतावरच रंगल्या प्रेमाच्या गप्पा, VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com