सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार घातलेला आहे. अनेक शहरी भाग देखील जोरदार पडणाऱ्या पावसाने पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत. सोशल मीडियावर आपण अनेक यासंबंधित व्हिडिओ पाहत असतो. अशातच सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने सर्वांच्या मनात धडकी भरवली आहे. ज्या व्हिडिओ पुराच्या पाण्यात त्यांची कार अडकली होती मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना जीव वाचवण्यासाठी कारच्या वर बसावे लागले. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.
सुटकेचा थरार....
व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात (Gujarat) राज्यातील साबरकांठा या जिल्ह्यातील असल्याचे समजते. जिथल्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला आणि एक पुरुष एका कारच्या छतावर बसलेले आहे. मात्र कारच्या आजूबाजूसा सर्वत्र जिथे नजर जाईल तिथे सर्वत्र असे पुराचे पाणी भरलेले आहे.
कारच्या (Car) छतावर जीव वाचवण्यासाठी बसलेल्या असल्याने दोघही घाबरुन गेल्याचे दिसत आहे. पुराच्या पाण्याची उंची आणि प्रवाह अतिशय जोरदार आहे. घाबरलेला व्यक्ती बचावासाठी कॉल करताना दिसत आहे. नशिबाने काही काही चुकीचे घडण्याआधी बचाव पथक त्यांच्या मदतीसाठी येताना दिसून येत आहे. बचाव पथकाच्या मदतीने दोघांनाही अडकलेल्या पूराच्या पाण्यातून सुखरुप सोडवण्यात यश येते.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया (Media) प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@gaurav1307kumar'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकल्याचे प्रतिक्रियामधून दिसून येत आहे. सोशल मीडियावर याआधीही पुराच्या पाण्यातून नागरिकांना वाचवण्याचे असे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.