Fact Check : इन्स्टाग्राम बंद होणार, फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Fact Check : इन्स्टाग्राम बंद होणार, त्यामुळे फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय, जाणून घ्या.
इन्स्टाग्राम बंद होणार, फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Instagram UpdateSaam TV
Published On

मुंबई : इन्स्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आताच सगळा डाटा सेव्ह करून ठेवा. कधीही इन्स्टाग्राम बंद होईल आणि तुमचा डाटा उडून जाईल. कारण, सोशल मीडियावर असा एक मेसेज व्हायरल होतोय की इन्टाग्राम बंद होणार आहे. लाखो, कोट्यवधी लोक इन्स्टाग्राम वापरतात. फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर केला जातो. एकवेळ जेवायला नसेल तरी चालेल. मात्र, इन्स्टाग्राम हवं अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

सर्वात मोठ्या संख्येनं पाहिला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इन्स्टाग्राम 10 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. फेसबुकवर एका यूजरने व्हिडिओ शेअर करून इन्स्टाग्राम 10 सप्टेंबरला बंद होणार असून लवकरच महत्त्वाचा डाटा, फोटो सेव्ह करून ठेवा. हे आपल्या मित्रांना कळवा.

आम्ही याचा तपास करण्यासाठी गुगल ओपन सर्चवर सगळे कीवर्ड्स वापरले...त्यावेळी आम्हाला इन्स्टाग्राम बंद पडणार का याबाबत काय सत्य आढळून आलं ते पाहूयात.

इन्स्टाग्राम बंद होणार, फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Instagram Tips: इन्स्टाग्रामवर रिल्स अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती?, झटक्यात वाढतील फॉलोअर्स

इन्स्टाग्राम बंद होणार असल्याची अधिकृत माहिती नाही

एवढं मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तात्काळ बंद होत नाही

कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याआधी घोषणा केली जाते

इन्स्टाग्राम बंद होणार ही अफवा

इन्स्टाग्राम बंद होणार, फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Instagram Followers: मराठमोळ्या अभिनेत्रींनी इन्स्टाग्रामवर मार्केट केलं जाम, सर्वाधिक फॉलोवर्समध्ये ही अभिनेत्री अव्वल

इन्स्टाग्राम ही सध्याची सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. करोडो लोक इन्स्टाग्राम वापरतात. रात्रंदिवस फोटो शेअर, लाईक्स करत असतात. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून युजर्सशी दिशाभूल केली जातेय. आमच्या पडताळणीत इन्स्टाग्राम बंद होणार हा दावा असत्य ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com