सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामची सध्या चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक जण या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात.
प्रत्येकाला वाटते की त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या वाढावी. पोस्टला चांगले व्ह्यूज आणि लाइक्स मिळाव्यात.
इन्स्टावर आपले फॉलोअर्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करून अपलोड करत असतात.
बऱ्याचदा चांगल्या कॉलिटीचा कंटेट अपलोड करून काहीच फायदा होत नाही. यासाठी काही महत्वाच्या टिप्स फॉलो करा.
इन्स्टावर रिल्स अपलोड करण्यासाठी सर्वात आधी लक्षात घ्या की कंटेंटची क्वालिटी खूपच चांगली पाहिजे.
कंटेंट कॉलिटीसोबत व्हिडीओला योग्य वेळी पोस्ट करणे पण गरजेचे असते. योग्य वेळी व्हिडीओ पोस्ट केल्यावर चांगले व्ह्यूज मिळतात.
योग्य वेळी रिल्स पोस्ट केल्यामुळे त्याचा रिच चांगला वाढतो आणि फॉलोअर्स वाढण्यास मदत होते.
इन्स्टावर रिल्स पोस्ट करण्याची योग्य वेळ सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता देखील तुम्ही पोस्ट करू शकता.
याव्यतिरिक्त तुम्ही इन्स्टावर रात्री ९ वाजता किंवा रात्री ११ ते १२ च्या दरम्यान रिल्स पोस्ट करू शकता.
या वेळेमध्ये बरीच लोकं फ्री असतात. या काळामध्ये ते जास्तीत जास्त इन्स्टाग्रामचा वापर करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.