Janmashtami 2024 : जन्माष्टमीला सुंदर रिल व्हिडिओ बनवण्यासाठी बॉलिवूडची जबरदस्त गाणी; आजच प्ले लिस्ट ठरवा आणि धमाल करा

Janmashtami 2024 Bollywood Songs : या दिवशी सर्व तरुण तरुणी दहीहंडी फोडण्याच्या तयारीत असतात. दहीहंडी फोडणे पावसात भिजणे आणि सुंदर गाण्यांवर ताल धरणे प्रत्येकाला आवडतं.
Janmashtami 2024 Bollywood Songs
Janmashtami 2024 Saam TV
Published On

या वर्षी २६ ऑगस्टला म्हणजेच उद्या देशभरात श्री कृष्ण जन्म सोहळा साजरा होत आहे. भारतात प्रत्येक सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्व तरुण तरुणी दहीहंडी फोडण्याच्या तयारीत असतात. दहीहंडी फोडणे पावसात भिजणे आणि सुंदर गाण्यांवर ताल धरणे प्रत्येकाला आवडतं.

Janmashtami 2024 Bollywood Songs
Shri Krishna Janmashtami 2023 : जन्माष्टमीला या पद्धतीने करा बाळ गोपाळांची पूजा, नियमांचे पालन केल्यास श्रीकृष्ण होईल प्रसन्न

अशात सध्या रिल व्हिडिओचं क्रेझ आहे. कोणताही सण असो तरुण मुलं आणि मुली दोन्ही भरपूर रिल व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर धमाल करतात. आता तुम्हाला सुद्धा असेच सुंदर रिल व्हिडिओ बनवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी श्री कृष्ण जन्म सोहळ्यावर आधारीत बॉलिवूडच्या काही सुंदर गाण्यांची लिस्ट निवडली आहे.

वो किसना है

विविके ऑबेरॉय आणि ईशा शरवानी यांचं 'वो किसना है' हे बॉलिवूडच फार प्रसिद्ध गाणं आहे. उद्याच्या कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही हे गाणं लावून यावर सुंदर डान्स तसेच रिल व्हिडिओ बनवू शकता. या गाण्याचे बोल इतके सुंदर आहेत की तुमचं स्टेटस सर्वांनाच आवडेल.

गो गो गोविंदा

तुम्ही स्वत: गोविंदा असाल आणि दहीहंडी फोडताना तुम्हाला स्वत:चा रिल व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यासाठी गो गो गोविंदा हे गाणं उत्तम आहे. तुम्ही या गाण्यावर हटके पोज देत डान्स करू शकता आणि रिल व्हिडिओ सुद्धा बनवू शकता. महिला गोविंदांसाठी तर हे गाणं अगदी बेस्ट आहे.

मन बसिया

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा 'तेरे नाम' चित्रपट प्रत्येकानेच पाहिला असेल. या चित्रपटात श्री कृष्णाचं एक सुंदर गाणं आहे. 'मन बसिया' हे गाणं अगदी शांत आणि मनाला प्रसन्न करणारं आहे. तुम्ही हे गाणं सकाळी सकाळी जन्माष्टमीला लावू शकता.

मैया यशोदा

मैया यशोदा हे तर अनेकांचं फेवरेट गाणं असेल. बऱ्याच तरुणींना हे गाणं फार आवडतं. यंदा जन्माष्टमी साजरी करताना तुमच्या परिसरात विविध कार्यक्रम असतील तर त्यात तुम्ही या गाण्यावर डान्स करू शकता. मैया यशोदा हे सुद्धा बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणं आहे.

यशोदा का नंदलाला

संजोग हा चित्रपटातील यशोदा का नंदलाला हे गाणं बाळ गोपाळाची पुजा करताना तुम्ही लावू शकता. तसेच तुम्ही या गाण्यावर सुंदर आणि मस्त व्हिडिओ सुद्धा बनवू शकता. त्यामुळे या जन्माष्टमीला आणि दहीहंडीला आणखी खास बनवण्यासाठी तुमच्या प्ले लिस्टमध्ये ही गाणी आजच सेव करून ठेवा.

Janmashtami 2024 Bollywood Songs
Sara Tendulkar Debut Bollywood : सारा तेंडुलकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?, सोशल मीडियावर साराचा व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com