Dahi Handi 2024 : गोविंदा आला रे आला…; आकाशात चमकेल दहीहंडी, वाचा सजवण्याच्या भन्नाट आयडिया
गोकुळाष्टमी
सध्या गोकुळाष्टमीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वजण दहीहंडीची तयारी करताना पाहायला मिळत आहेत.
दहीहंडी
यंदा दहीहंडीचा उत्सव २७ ऑगस्टला सर्वत्र आनंदात साजरा केला जाणार आहे.
गोविंदा पथक
अनेक गोविंदा पथक दहीहंडी फोडून या सणाची गोडी वाढवतात.
आयडिया
दहीहंडी सजवण्यासाठी स्वस्तात मस्त भन्नाट आयडिया जाणून घ्या.
हंडी
दहीहंडी सजवण्यासाठी बाजारातून छान मटकी घेऊन या. त्याची माती चांगली असेल याची खबरदारी घ्या.
वॉटर कलर
दहीहंडी सजवण्यासाठी तुम्ही वॉटर कलरचा वापर करू शकता. यामुळे हंडी कलरफुल होईल.
रंगीबेरंगी फुल
सजावटीसाठी रंगीबेरंगी रिबन आणि फुलांचा वापर करू शकता.
मंडला कलाकृती
हंडीवर मंडला कलाकृती किंवा मोराची कलाकृती करू शकता.
मोत्यांनी सजवा
दहीहंडी सजवण्यासाठी मोत्यांचा वापर करा. पांढऱ्या रंगाचे मोती हंडीची शोभा वाढवतील. हंडीला मारलेला रंग किंवा केलेली डिझाईन खराब होऊ नये म्हणून पेंटिंग केल्यानंतर दहीहंडीवर माती लावा.
मोरपंख
दहीहंडीच्या वरच्या भागावर मोरपंख लटकवा आणि नारळ ठेवा. वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे कुंदन हंडीला चिकटवून छान सुकण्यासाठी ठेवून द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

