ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महानायक अमिताभ बच्चन मूळचे इलाहाबादचे राहणारे. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी होते. अमिताभ यांचं खरं नाव इंकलाब श्रीवास्तव आहे. ते बदलून त्यांनी अमिताभ ठेवलं.
बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरूख सर्वत्र ओळखला जातो. पण त्याचं पूर्ण नाव मोहम्मद शाहरूख खान आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यानं आपलं नाव बदलून शाहरूख खान ठेवलं.
सैफ अली खाननं अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलं आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याचं नाव साजिद अली खान होतं
सनी देओलचे सुपरहिट चित्रपट सर्वांनी बघितले असतीलच. पण त्याचं खरं नाव अनेकांना माहीत नाही. त्याचं खरं नाव हे अजय देओल आहे.
मल्लिका शेरावत हिने चित्रपटसृष्टीत आल्यानंतर नाव बदललं. तिचं खरं नाव रिमा लांबा आहे.
मिथुन चक्रवर्तीला सगळेच ओळखतात. पण त्याचं खरं नाव गौरंगा चक्रवर्ती आहे.
या यादीत सनी लिओनीदेखील आहे. अभिनेत्रीचं खरं नाव करनजीत कौर वोहरा आहे. ते बदलून तिनं सनी लिओनी ठेवलं.
सुपरस्टार राजेश खन्ना हे नाव घराघरांत पोहोचलं ते अभिनयानं. पण खूपच कमी लोक असे आहेत की त्यांचं खरं नाव माहीत नाही. त्याचं खरं नाव जतीन खन्ना होतं.
'बाहुबली' अभिनेता प्रभास यानं दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण प्रभासचं खरं नाव माहीत आहे का? त्याचं संपूर्ण नाव उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू असं आहे.
अभिनेता जॅकी श्रॉफचं खरं नाव जयकिशन काकू भाई असं आहे. त्याचे मित्र त्याला जॅकी नावानं हाक मारायचे. त्यावरूनच त्यानं स्वतःचं नाव जॅकी श्रॉफ ठेवलं.