Western Railway: मुंबईत होतंय आणखी एक नवीन रेल्वे टर्मिनस, कुठे आणि कसे असेल? वाचा सविस्तर

New Railway Terminus Near Jogeshwari Station: मुंबईमध्ये नवीन रेल्वे टर्मिनस होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान हे टर्मिनस तयार केले जात आहे.
Western Railway: मुंबईत होतंय आणखी एक नवीन रेल्वे टर्मिनस, कुठे आणि कसे असेल? वाचा सविस्तर
New Railway Terminus Near Jogeshwari StationSaam Tv
Published On

रेल्व प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन नवनवीन उपक्रम राबवत असते. पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे टर्मिनस तयार होत आहे. पश्चिम रेल्वेकडून हे नवीन टर्मिनस बांधण्यात येत आहे. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान हे टर्मिनस तयार केले जात आहे. हे मुंबईमधील सातवे रेल्वे टर्मिनस असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना या नव्या टर्मिनसचा खूप फायदा होणार आहे. या टर्मिनसमुळे लांब पल्ल्याच्या ट्रेन पकडण्यासाठी त्यांना मुंबई सेंट्रल, वांद्रे, दादर आणि अंधेरीला जावे लागणार नाही.

७६ टक्के काम पूर्ण -

राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान तयार करण्यात येत असलेल्या टर्मिनसचे ७६ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या नव्या टर्मिनसच्या लेबर शेडचे काम पूर्ण झाले आहे. अमृत भारत स्थानक विकास या योजनेअंतर्गत या नव्या टर्मिनसचे काम केले जात आहे. या टर्मिनसच्या कव्हरशेड, सर्व्हिस बिल्डिंग, प्लॅटफॉर्म आणि स्टेशन बिल्डिंगचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर या टर्मिनस रूळाचे काम करण्यात येणार आहे.

Western Railway: मुंबईत होतंय आणखी एक नवीन रेल्वे टर्मिनस, कुठे आणि कसे असेल? वाचा सविस्तर
Mumbai Local : मुंबईतील लोकल गर्दी कशी कमी होणार? डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला महत्वाचा संदेश, वाचा

प्रवाशांना होणार फायदा -

या नव्या टर्मिनसमुळे वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या १२ लांब पल्ल्यांच्या गाड्या नवीन जोगेश्वरी टर्मिनसवर स्थलांतरीत केल्या जाऊ शकतात. या नव्या टर्मिनसमुळे पश्चिम उपनगरील रेल्वे मार्गावरील ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे. याठिकाणावरून जास्त संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याची क्षमता आणखी वाढेल. या टर्मिनसचा पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होईल.

नवे टर्मिनस कसे असेल -

नव्या टर्मिनसवर बेट आणि होम प्रकारचे २ प्लॅटफॉर्म असणार आहे. याठिकाणी ३ मार्गिका असणार आहेत. या टर्मिनसला दोन मजली सेवा इमारत आणि पाच मजली स्टेनशची इमारत असणार आहे. चार किमी लांबीच्या तीन कोटिंग टर्मिनस रेल्वे मार्गिका असेल. महत्वाचे म्हणजे या टर्मिनसला मेट्रो मार्ग ७, मेट्रो मार्ग २ अ आणि मेट्रो मार्ग ६ याची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना या नवीन टर्मिनसला येणं सोपं होणार आहे.

Western Railway: मुंबईत होतंय आणखी एक नवीन रेल्वे टर्मिनस, कुठे आणि कसे असेल? वाचा सविस्तर
Mumbai-Pune Distance: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार, प्रवाशांचा एक तास वाचणार; कसं ते पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com