Mumbai Local : मुंबईतील लोकल गर्दी कशी कमी होणार? डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला महत्वाचा संदेश, वाचा

Mumbai Local train : मुंबईतील लोकल गर्दी कमी करण्याविषयी डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या महत्वाचा संदेश दिला आहे. या देखाव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
 मुंबईतील लोकल गर्दी कशी कमी होणार? डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला महत्वाचा संदेश, वाचा
Ganesh festival Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : मुंबईतील लोकल ट्रेन म्हटलं तर प्रवाशांची गर्दी आलीच. या लोकल गर्दीतूनच प्रवाशांना तासंतास प्रवास करावा लागतो. कर्जत ते डोंबिवली दरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना लोकलने गर्दीतूनच कार्यालय गाठावं लागतं. या लोकल गर्दीत प्रवास करताना प्रवाशांची दमछाक होते. त्यामुळे हजारो प्रवासी या प्रवासाला त्रस्त झाले आहेत. या लोकल गर्दीवरुन गणेशभक्त कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सरकारला उपाय सुचवला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात गणोशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. यावेळी विविध मंडळे आणि घरगुती बाप्पाकडून समाजाला वेगवेगळा संदेश दिला जात आहे. डोंबिवलीतील ९० फिट रोडवरील बालाजी अंगण सोसायटीत राहणारे रुपेश राऊत आणि त्यांचे कुटुंबीय यंदा त्यांच्या घरातील बाप्पाच्या देखाव्यातून माध्यमातून एक महत्वाच संदेश देत आहेत. डोंबिवलीतील राऊत कुटुंबायांनी यंदा डोंबिलीत लोकल ट्रेनमधील वाढत्या गर्दीची समस्या उचलून धरली आहे.

 मुंबईतील लोकल गर्दी कशी कमी होणार? डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला महत्वाचा संदेश, वाचा
Mumbai Local Train : ऐन गणेशोत्सवात मुंबई लोकलचा खोळंबा; मध्य आणि पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी संतापले

राऊत कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून संदेश देत म्हटलं की, 'लोकल गर्दीमुळे आजतायगायत अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे फक्त लोकलच्या फेऱ्या वाढवून प्रश्न सुटणार नाही. यावर उपाय म्हणजे डोंबिवलीत रोजगार निर्मिती करणे होय'.

'राऊत कुटुंबीयांच्या मते, जर डोंबिवलीत एक मोठे आयटी पार्क उभारले गेले तर लोकांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे लोकल गर्दी आपोआप कमी होईल. सांस्कृतिक डोंबिवलीसोबत आधुकनिक तंत्रज्ञानाची ओळख असणारी डोंबिवली उभारण्याची काळाची गरज आहे, असे राऊत यांनी सांगितले. त्यांचा गणेशोत्सवाचा देखावा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

 मुंबईतील लोकल गर्दी कशी कमी होणार? डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला महत्वाचा संदेश, वाचा
Mumbai Local Train : आगमनापूर्वीच मुंबईकरांना गणपती बाप्पा पावला, लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

ऐन गणेशोत्सवात लोकलचा खोळंबा

ऐन गणेशोत्सवात आज सकाळी मुंबई लोकलची वाहतूक खोळंबली. मध्यम आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या लोकांचा लेटमार्क लागणार आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने प्रवास प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com