Mumbai News: जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड होणार सुसाट, अडथळा ठरणारी 87 दुकाने पालिकेने हटवली!

Latest News: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अतिक्रमण निष्काशन विभागाने या रोडवर वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने मंगळवारी तोडक कारवाई करून हटवली.
jogeshwari -vikhroli link road
jogeshwari -vikhroli link roadSaam TV
Published On

Mumbai News: पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी आणि विक्रोळी (jogeshwari vikroli link road) यांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या आता कायमची सुटणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अतिक्रमण निष्काशन विभागाने या रोडवर वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने मंगळवारी तोडक कारवाई करून हटवली. त्यामुळे आता जोगेश्वर-विक्रोळी लिंक रोड पूर्वीपेक्षाही जास्त रुंद होणार असून पावसाळ्यापूर्वीच या रोडवरील वाहतूक सुसाट होण्यास मोलाची मदत होणार आहे.

jogeshwari -vikhroli link road
Dhule Factory Blast : धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात मोठा स्फोट, 4 महिलांचा जागीच मृत्यू, 2 जखमी

पश्चिम उपनगरांमध्ये लोकवस्ती वाढत गेली त्याप्रमाणात वाहनांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरीक खूपच त्रस्त झाले आहेत. अशामध्ये पालिकेकडून यावर कायमचा पर्याय शोधून काढण्यात आला आहे.

jogeshwari -vikhroli link road
Viral Video: आलिया गावात अजब वरात! नवरदेव घोड्यावर अन् घोडा खाटेवर, हटके मिरवणूकीची होतेय सर्वत्र चर्चा; VIDEO तुफान VIRAL

मुंबई महानगर पालिकेकडून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काम युद्धपातळीवर करून ते मार्गी लावण्यात आले आहे. जोगेश्वरी पूर्व येथील विक्रोळी- जोगेश्वरी लिंक रोड रुंदीकरणात दुर्गा नगर येथील बाधित होणारे एकूण 87 बांधकामे के/पूर्व विभागामार्फत निष्कासित करण्यात आली. त्यामुळे आता यामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे.

jogeshwari -vikhroli link road
Krushna Abhishek Comeback In TKSS: तो पुन्हा येतोय: द कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेकची होणार रिएन्ट्री

जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरे यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून मुंबई मेट्रोची मार्गिका क्रमांक 6 चे देखील काम प्रगतीपथावर आहे. रुंदीकरणामुळे जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल.

के/पूर्व विभागाचे 14 अधिकारी, 5 जेसीबी, 50 कामगार तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी निष्कासन कार्यवाही करण्यासाठी उपस्थित होते. पालिकेकडून करण्यात आलेल्या या तोडक कारवाईमुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची कायमची सुटका होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com