Dhule Factory Blast
Dhule Factory BlastSaam Tv

Dhule Factory Blast : धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात मोठा स्फोट, 4 महिलांचा जागीच मृत्यू, 2 जखमी

Latest Crime News: धुळ्यातील भवानी सेलिब्रेशन या मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला.
Published on

Dhule Factory Blast News : धुळ्यामध्ये (Dhule) भयंकर घटना घडली आहे. मेणबत्ती निर्मितीच्या (Candle Factory) कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नंदुरबार येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Dhule Factory Blast
Pimpri Chinchwad Hoarding Collapse: पिंपरी-चिंचवड होर्डिंग अपघातात 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांची मदत जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील भवानी सेलिब्रेशन या मेणबत्ती निर्मिती करणाऱ्या कारखान्यात मंगळवारी दुपारी अचानक स्फोट झाला. धुळ्यातील साक्री तालुक्यातील चिपलीपाडा येथे हा कारखाना आहे. या भीषण स्फोटात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तेथील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Dhule Factory Blast
Jalna Crime News: मला तुझी बायको खूप आवडते, तरुणाचा थेट साडूला फोन; मेहुणीसोबत केलं संतापजनक कृत्य

या कारखान्यात काम करणाऱ्या चार महिलांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्या महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, धुळे साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com