Pimpri Chinchwad Hoarding Collapse: पिंपरी-चिंचवड होर्डिंग अपघातात 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांची मदत जाहीर

Latest News: या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त केले.
Pimpri Accident update
Pimpri Accident updateSaam TV

Mumbai News: पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरातील रावेत परिसरात सोमवारी होर्डिंग कोसळून (Hoarding Collapse) ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त केले. तसंच त्यांनी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 3 लाखांची मदत जाहीर केली.

Pimpri Accident update
Pimpri Chinchwad News: होर्डिंग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री कार्यालयाकडून होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.'

सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बंगळुरू- मुंबई हायवे शेजारी असलेल्या स्वामी हॉटेलजवळ एक मोठे अनधिकृत होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. शोभा विजय टाक (वय ५०), वर्षा विलास केदारी (वय ५०), रामअवध प्रलाद आत्मज (वय २९), भारती नितीन मंचल (वय ३३) आणि अनिता उमेश रॉय (वय ४५) या पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला होता.

Pimpri Accident update
Ambajogai Bus Accident: बुट्टेनाथ घाटात एसटी बसचा भीषण अपघात; २० ते २५ प्रवासी जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, या घटनेचा तपास रावेत पोलिसांकडून सुरु आहे. रावेत पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरेणात पोलिसांनी जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग तयार करणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींना अटक करण्यासाठी रावेत पोलिसांनी चार पोलिसांची पथकं तयार केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com