Viral Video: भाई रुक जा....पठ्ठ्याने मगरीला थेट पाठीवरच बसवले अन् गावभर फिरवले; व्हायरल VIDEO पाहून नेटकरी हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत प्रत्येकाने पाहावे.तुम्हीही एकदा व्हिडिओ पहा.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video: सोशल मीडियावर दर मिनिटाला बरेच अतंरगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल होत असलेले व्हिडिओ अनेकदा व्यक्तींचे हटके जुगाडचे असतात तर कधी नेटकऱ्यांना हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क एका व्यक्तीने त्यांच्या खांद्यावर जिवंत मगरीला उचलून गावभर फिरवले आहे. नक्की व्हायरल व्हिडिओत काय घडले ते तुम्ही पहा.

साप (Snake)असो वा लहान प्राणी त्याला पाहताच प्रत्येक व्यक्ती घाबरून जातो, मात्र त्या जागी जग भली मोठी मगर असल्यास प्रत्येक व्यक्तीची दात खिळी बसते. मगरीला लांबून पाहिल्यानंतरही प्रत्येकजण घाबरतो मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क जिंवत मगरीला खांद्यावर उचलून पाण्यातून बाहेर आणत आहे. या व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओत नेमके काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला गावाकडील एक नदी दिसत आहे. नदीकडे अनेक व्यक्ती पाहत असतात त्यानंतर त्याच नदीतून एक व्यक्ती भल्यामोठ्या मगरीला खांद्यावर घेऊन बाहेर निघतो. व्हिडिओत मगर किती भलीमोठी आहे हे तुम्हाला दिसेल मात्र तो व्यक्ती न घाबरता त्या मगरीला त्याच्या खांद्यावर ठेवून पाण्याबाहेरही आणतो आणि तो रस्त्याच्या दिशेने चालू लागतो, त्याच्या पाठी-पाठी गावातील अनेक लहान मोठी पोर आणि व्यक्ती चालत येताना व्हिडिओत दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''altu.faltu'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''मगरीला पाण्यात बुडण्यापासून वाचवले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे हे काय'',तर अनेक यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Virat Kohli Viral Video: एकटा विराट ऑस्ट्रेलियन फॅन्सला भिडला! पॅव्हेलियनमध्ये जाताना जोरदार राडा, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com