

उज्जैनमधील हनुमान मूर्ती हलत नसल्याचा दावा
१००० वर्षे जुनी हनुमान मूर्ती असल्याचा दावा
हनुमान मूर्ती न हलण्यामागचं खरं कारण आलं समोर
बुलडोजरने हनुमान मूर्ती का हलली नाही याची होतेय चर्चा
उज्जैन हनुमान मंदिराचा व्हिडिओ होतोय व्हायरल
रस्ता रुंदीकरणासाठी हनुमानाची मूर्ती हटवली जात होती. मात्र, मंदिर हटवलं तरी मूर्ती जाग्यावरून हालतच नसल्याचा दावा करण्यात आलाय. तसा व्हिडिओही व्हायरल होतोय. हा चमत्कार असल्याचा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
हनुमानाची मूर्ती. जवळपास 1 हजार वर्षापूर्वीची ही मूर्ती असल्याचा दावा केला जातोय. ही मूर्ती हालत नसल्याचा दावा करण्यात आलाय...रस्ता रुंदीकरणासाठी हनुमानाची ही मूर्ती हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मूर्तीपुढे बुलडोजर फेल झालाय. 10 दिवस अधिकारी मशिन्स लावून हनुमानाची मूर्ती हलवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र, मूर्ती हालत नसल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय. ही मूर्ती उज्जैनमधील हनुमान मंदिरात आहे. मंदिर हालत नसल्याने महिला, मुलं आणि वृद्ध मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतायत. मंदिराच्या परिसरात भजन आणि कीर्तन केलं जातंय.
उज्जैनमधील उभी असलेली ही हनुमानाची मूर्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय. उज्जैनमध्ये कांतल चौक ते क्षत्रिय चौक पर्यंत रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. खाडे हनुमान मंदिर याच प्रकल्पाच्या कक्षेत येतं. मंदिराची मूळ रचना आधीच हटवण्यात आली. पण, भव्य मूर्ती अजूनही जागेवरच आहे.
मूर्ती हालत नसल्याचा दावा केल्याने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झालीय...पण, खरंच हा चमत्कार आहे का? मूर्ती जाग्यावरून हालत नाहीये का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. हा चमत्कार असल्याचा दावा केल्याने व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. उज्जैनमधील प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिलीय का? हे पाहिलं. तसेच काही तज्ज्ञांकडूनही याबाबत माहिती मिळवली.
साम इन्व्हिस्टिगेशनमधून काय समोर आले ते आपण पाहणार आहोत. मूर्ती हालत नसल्याचा हा चमत्कार नाही. मूर्ती सुमारे 1 हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता आहे. मूर्तीला कोणती हानी पोहचू नये याची काळजी घेतली जातेय. यंत्रसामग्रीचा वापर केल्यास मूर्तीचे नुकसान होऊ शकते.
हनुमान मूर्ती जमिनीखाली खोलवर गाडलेली असण्याची शक्यता आहे. तिचा पाया सामान्य मूर्तींपेक्षा खूपच मजबूत असू शकतो. मूर्ती हलवताना तिला तडा जाण्याचा धोका असल्याने प्रशासन अत्यंत सावधगिरी बाळगतंय. भक्तांच्या भावनांचाही विचार केला जात असून, मूर्ती काळजीपूर्वक हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, हा चमत्कार नसल्याचं आमच्या पडताळणीत स्पष्ट झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.